जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / hasan mushrif ed raid : हसन मुश्रीफांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता, तिन्ही मुलांवर कारवाईची मागणी

hasan mushrif ed raid : हसन मुश्रीफांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता, तिन्ही मुलांवर कारवाईची मागणी

hasan mushrif ed raid : हसन मुश्रीफांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता, तिन्ही मुलांवर कारवाईची मागणी

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (दि.17) सुनावणी झाली.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (दि.17) सुनावणी झाली. दरम्यान यावर ईडीने जामीन अर्जावर विरोध करत मुंबई सत्र न्यायालयात लेखी उत्तर सादर केले आहे. ईडीनं मुश्रीफ बंधूना अटकपूर्व जामीन देण्यास यावर विरोध केला आहे. यामुळे मुश्रीफांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अटकपूर्व जामीन दिला तर ईडीकडून तपासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जाहिरात

दरम्यान ईडीकडून पी चिदंबरम यांच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ कोर्टा समोर दिला आहे. ईडीने तपासात पुरेसं स्वातंत्र्य देण्याची  मागणीही केली आहे. दोन वेळा समन्स देऊन देखील नाविद  मुश्रीफ हे ईडी समोर चौकशीसाठी हजर न झाल्याचा ईडीकडून आरोप करण्यात आला आहे. नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष PMLA कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी दाखल अर्ज दाखल केला आहे.

हे ही वाचा :  Kasba By Election : आजारी गिरीश बापट निवडणूक प्रचाराच्या रिंगणात अन् आनंद दवेंचा मोठा निर्णय म्हणाले आता…

राजकीय हेतून अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा उल्लेख मुश्रीफांच्या अर्जात करण्यात आला आहे. केंद्रीय तपासयंत्रणा ईडीवर हा आरोप करण्यात आला आहे. ईडीकडून अटक होईल अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे.

जाहिरात

हसन मुश्रीफ यांची मुले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. प्राथमिक चौकशीत कारखान्याला मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे आणि या पैशाच्या स्त्रोताविषयी कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही. हा पैसा अवैध मार्गाने आल्याचे ईडीने म्हटले आहे.  

हे ही वाचा :  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत घटनापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय; मोठी अपडेट समोर

दरम्यान, हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांकडून वरिष्ठ वकील आबाद पोंडा आणि प्रशांत पाटील यांनी सत्र न्यायालयात बाजू मांडली. ईडीकडून हसन मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा मुख्य हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याविरोधात कोणतेही गैरव्यवहार केल्याचे समोर आले नसल्याचे सांगितले. ईडीने हे आरोप फेटाळून लावताना न्यायालयात दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले. छापेमारी कायदेशीर मार्गाने झाल्याने ईडीने सांगितले.  

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात