कोल्हापूर, 20 डिसेंबर : कोल्हापूरचे लेखक डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या चंबुखडी ड्रीम्स या पुस्तकाला सार्वजनिक वाचनालय, नाशिक अर्थात सावाना तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे. 2020 सालातील मु.ब. यंदे पुरस्कारासाठी या पुस्तकाची निवड झालीय. सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे दरवर्षी पुरस्कार दिले जातात. या आठवड्यात 2019 आणि 2020 मधील पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी दिली आहे. या पुस्तकाचे लेखक डॉ. जगन्नाथ पाटील हे जागतिक शिक्षणतज्ञ आणि नॅक सल्लागार आहेत. यापूर्वी या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा आण्णाभाऊ साठे 2020 हा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 24 ते 31 डिसेंबर दरम्यान नाशिकयेथे ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. का आहे महत्त्व? सार्वजनिक वाचनालय, नाशिक हे खूप जुने असे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले महाराष्ट्रातील एक ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाला एक जवळपास १८२ वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. साहित्य विश्वात आपला अनोखा नावलौकिक असलेले दिग्गज साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे दीर्घकाळ या संस्थेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे सावानाच्या पुरस्कारांना साहित्य विश्वात एक विशेष महत्व आहे. रेणुका देवीच्या आंबील यात्रेला का आहे इतकं महत्त्व? Video काय आहे चंबुखडी ड्रिम्स ? डॉ. जगन्नाथ पाटील यांचे ‘चंबुखडी ड्रीम्स’ हे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. संघर्ष करत असणाऱ्या प्रत्येक तरुणांना हे पुस्तक प्रेरणा देते. या पुस्तकाची पहिली आवृत्ती ग्रंथालीमार्फत तर दुसरी आवृत्ती विजीगिशा प्रकाशनामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. रंकाळ्यातील पक्षी निरिक्षणात आढळले 7 विदेशी पाहुणे, पाहा काय आहे खास डॉ. जगन्नाथ पाटील हे कोल्हापुरातील पत्रकारिता क्षेत्रातील पहिले पीएचडी धारक आहेत. त्याचबरोबर त्यांनी पहिल्यांदा सेट-नेट उत्तीर्ण केली होती. सर्वात कमी वयात शिवाजी विद्यापीठात कुलसचिव बनण्याचा मानही त्यांना आहे. कोल्हापुरात टिटवे या गावी त्यानी शहीद शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे. यामध्ये त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे अर्थात SNDT वूमन्स युनिव्हर्सिटीचे ग्रामीण भागातील पहिले केंद्र सुरू केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







