कोल्हापूर, 8 मार्च : ऊसाच्या शेताला लागलेल्या आगीत होरपळून शेतकर्याचा मृत्यू झाला आहे. राधानगरी तालुक्यातील तुंरबे-कासारवाडा मार्गावर ही घटना घडली आहे. बाळासो बलुगडे असं आगीत होरपळून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. तुंरबे-कासारवाडा मार्गावरील बाळासो बलुगडे यांच्या ऊसाच्या शेतीला अचानक उसाला आग लागली. मोठ्या कष्टाने वाढवलेलं उभं पीक जळताना पाहून शेतकरी बाळासो बलुगडे यांचा जीव तळमळला. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी त्यांनी धाव घेतली. आग इतकी भडकली होती की तिने शेतकऱ्याचाही बळी घेतला. आग विझवण्यासाठी ऊसाच्या शेतीत गेलेले बाळासो बलुगडे हेच आगीच्या भक्ष्यस्थानी आले. आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. काबाडकष्ट करून वाढवलं पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आपल्या जीवालाच मुकावं लागलं. हेही वाचा- कात्रजच्या डोंगरावर पेटला वणवा, आग विझवण्यासाठी धावून आले सयाजी शिंदे बाळासो बलुगडे यांच्या मृत्यूने तुंरबे-कासारवाडा परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. एका क्षणात सर्व होत्याचं नव्हतं झाल्याने बलुगडे कुटुंबाने मोठा आक्रोश केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.