जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईत गेट वे ॲाफ इंडिया का उभारण्यात आलं होतं? असा आहे इतिहास Video

मुंबईत गेट वे ॲाफ इंडिया का उभारण्यात आलं होतं? असा आहे इतिहास Video

मुंबईत गेट वे ॲाफ इंडिया का उभारण्यात आलं होतं? असा आहे इतिहास Video

मुंबईत गेट वे ॲाफ इंडिया का उभारण्यात आलं होतं? यामागचा इतिहास काय आहे जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 29 एप्रिल : ऊन असो वा पाऊस, मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे नेहमीच गर्दी असते. देशातील प्रसिद्ध ताज रेस्टॉरंटच्या समोर उभं असलेल्या गेटवे ऑफ इंडियामागील इतिहासही रंजक आहे. ब्रिटिशकाळात उभारण्यात आलेल्या गेटवे ऑफ इंडियाला 100 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. मुंबई ला आलात आणि गेटवे ऑफ इंडियाला आला नाही तर हा मुंबई दौरा अपूर्ण राहतो. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊन मुंबईतील या ऐतिहासिक वास्तूचा इतिहास. कधी झाली होती निर्मिती? अपोलो बंदराच्या किनाऱ्यावर 1911 साली गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली. इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचम आणि त्यांची पत्नी मेरी भारतात येणार होते. मात्र ते जेव्हा भारतात आले तेव्हा याचा मॉडेलच पाहू शकले. हे मॉडेल जॉर्ज विंटेटने तयार केलं होतं. या वास्तूच्या निर्मितीचं काम साधारण 1924 रोजी पूर्ण झालं. आठ मजल्यांइतका उंच दिसावा असा गेटवे ऑफ इंडिया इंडो-सरासेनिक वास्तूशिल्पाचं एक अद्भूत उदाहरण आहे. भव्य कमानींवर मुस्लिम स्थापत्य शैलीचा प्रभाव आहे. पिवळ्या बेसाल्ट आणि प्रबलित काँक्रीटच्या मिश्रणाचा वापर करून हे स्मारक बांधण्यात आले.

News18लोकमत
News18लोकमत

गेटवे ऑफ इंडियाच्या माहिती नसलेल्या गोष्टी - क्वीन मेरी आणि किंग जॉर्ज पंचम यांच्या भेटीचा सन्मान करण्यासाठी हे स्मारक बांधण्याची कल्पना असली तरी त्याचे बांधकाम 1915 मध्येच सुरू झाले. - 1911 मध्ये 2 दशलक्ष रुपये खर्चून भव्य वास्तू बांधण्यात आली. मात्र, निधीच्या कमतरतेमुळे महाद्वाराकडे जाणारा रस्ता कधीच बांधला गेला नाही. - स्वातंत्र्यानंतर ब्रिटीश साम्राज्याच्या शेवटच्या सैनिकांनी भारत सोडला तेव्हा ते या संरचनेतून गेले, ज्यामुळे भारतातील ब्रिटीश साम्राज्याचे वर्चस्व संपुष्टात आले.

Maharashtra Din Speech: महाराष्ट्र दिनानिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण, ‘या’ मुद्द्यांचा करा समावेश

गेटवेच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - गेटवे ऑफ इंडियाचा घुमट बांधण्यासाठी 21 दशलक्ष रुपये खर्च आला होता आणि संपूर्ण गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी 2.1 दशलक्ष रुपये खर्च आला. - काही कालावधीनंतर गेटवेवर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांची मूर्ती स्थापन्यात आली होती. - गेटवे ऑफ इंडियाला मुंबईचा ताजमहल म्हणूनही ओळखले जाते. - मुंबईतील कुलाबास्थित गेटवे ऑफ इंडिया इंडो सरसैनिक वास्तूशिल्पाचं अद्भूत उदाहरण आहे. ज्याची उंची तब्बल 8 मजली असल्याचं सांगितलं जातं. - एलिफंटा गुहेच्या दिशेने जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया एक प्रथम केंद्र आहे. - गेटवे ऑफ इंडिया हे ब्रिटीश वसाहतवादी राजवटीचे चित्रण करणारं स्‍मारक आहे. - भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेवटचे ब्रिटीश सैन्य गेटवेद्वारे युरोपात परतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात