मुंबई, 02 मे: सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. मशिदींवरील भोंग्यांवरुन राज्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या (Shiv Sena leader) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) यांच्यावर खोचक शब्दात निशाणा साधला आहे. राज ठाकरे मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगतील की, हनुमान चालीसा वाचा, मशिदींसमोर जाऊन दुप्पट आवाजात हनुमान चालीस लावा. मी जरा फिरून येतो, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर गृहखातं Action Mode मध्ये, कारवाईबाबत गृहमंत्री म्हणतात… राज ठाकरे मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगतील की, हनुमान चालीसा वाचा, मशिदींसमोर जाऊन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. मी जरा फिरून येतो. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावल्यानंतर काही भांडण आणि तंटे झाले तर तुम्ही तुमचं बघून घ्या, अशी राज ठाकरे यांची भूमिका असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पुढे त्या म्हणाल्या की, राज ठाकरे यांच्या मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आदेशामुळे तरुण मनसैनिक तुरुंगात जाऊन बसतील. तुम्ही तुमचं रेकॉर्ड बिघडवाल. मात्र राज ठाकरे हे सगळं तुम्हीच भोगा, असे म्हणतील. पण मनसैनिकही हुशार झाले आहेत. हे सगळे खरे नाही. भोंग्यांचा विषय निवडणुकीपुरता आहे, हे त्यांनाही माहिती आहे. तसंच मुंबईतल्या नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन यावेळी किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मुंबईत दंगली नकोत, ही ठाम भूमिका आपण घेतली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. मनसे कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा, महाआरतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचं मोठं पाऊल एमआयएम पक्षाच्या नेत्यांनीही याबाबत सबुरीची भूमिका घेतली आहे. भोंग्यांवरून वाद निर्माण झाल्यास डोकं थंड ठेऊन काम करा, असे आदेश आम्ही सुद्धा शिवसैनिकांना दिल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.