Home /News /mumbai /

राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर मुंबई पोलिसांच्या कारवाईचा बडगा, अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आता हे पाऊल

राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर मुंबई पोलिसांच्या कारवाईचा बडगा, अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आता हे पाऊल

औरंगाबादमध्ये (Aurangabad) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची सभा पार पडली. दुसऱ्या दिवशीच मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.

    मुंबई, 02 मे: रविवारी औरंगाबादमध्ये (Aurangabad) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची सभा पार पडली. यानंतर आता दुसऱ्या दिवशीच मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. मनसे कार्यकर्त्यांना अक्षय्या तृतीयाला होणाऱ्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. सामना कार्यालयाबाहेर बॅनर आणि शिवसेना भवन समोर हनुमान चालीसा लावलेल्या मनसे कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. माहिम विभागात अनेकांना नोटीस बजावली आहे. लक्ष्मण पाटील, उमेश गावडे यांना देखील पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मुंबई, ठाण्यात पोलीस सतर्क काल ही पोलिसांनी मुंबई, ठाण्यातल्या मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी 149 च्या नोटीसा बजावल्यात. राज्यातल्या मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे 3 मे रोजी शहरात अनुचित प्रकार घडल्यास आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कार्यकर्ते जबाबदार असतील, असा इशारा नोटिशीमध्ये देण्यात आला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाची तयारी सुरु केली आहे. नोटीस पाठवल्यानंतरही कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणाबाबत ठाम असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राज्यभरातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतवरले नाहीत तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी 3 मे रोजी राज्यात महाआरतीचं आयोजन करण्याची सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केली. दिव्या भारतीची कार्बन कॉपी आहे तिची बहीण; सुपरस्टार अभिनेत्रींनाही टक्कर देईल असं सौंदर्य  राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर मुंबई आणि ठाण्यात 3 मे रोजी हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीच्या आयोजनाची तयारी सुरु केली आहे. यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगीचे विनंती अर्ज पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अर्जाची दखल घेत पोलिसांनी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रक्षोभक घोषणा, सूचना आदींमुळे कोणतेही अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असेल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी नोटिशीत दिला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: MNS, Mumbai police

    पुढील बातम्या