मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'महारेरा' घोटाळ्याप्रकरणी डोंबिवलीत मोठी कारवाई, 5 बिल्डरना अटक

'महारेरा' घोटाळ्याप्रकरणी डोंबिवलीत मोठी कारवाई, 5 बिल्डरना अटक

महारेरा घोटाळा प्रकरणी डोंबिवलीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाणे एसआयटीने 5 बिल्डरना अटक केली आहे.

महारेरा घोटाळा प्रकरणी डोंबिवलीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाणे एसआयटीने 5 बिल्डरना अटक केली आहे.

महारेरा घोटाळा प्रकरणी डोंबिवलीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाणे एसआयटीने 5 बिल्डरना अटक केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali), India
  • Published by:  Shreyas

डोंबिवली, 23 नोव्हेंबर : महारेरा घोटाळा प्रकरणी डोंबिवलीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाणे एसआयटीने 5 बिल्डरना अटक केली आहे. केडीएमसीची बनावट कागदपत्र आणि शिक्के बनवून हा घोटाळा करण्यात आला होता. रेरा सर्टिफिकेट मिळवण्याकरता खोटी कागदपत्रं बनवण्यात आली होती. या प्रकरणात राजकीय लिंक असल्याचाही तपास यंत्रणांना संशय आहे.

या बिल्डरना अटक

मिलिंद दातार, सुनिल मढवी, आशू मंगेश, राजेश पाटील आणि रजत राजन या पाच बिल्डरना ठाणे एसआयटीने अटक केली आहे. बिल्डरना अटक केल्यानंतर याप्रकरणात राजकीय नेत्यांची नावं येणार का? याकडे लक्ष लागलं आहे.

ईडीचीही एण्ट्री

दरम्यान ऑक्टोबर महिन्यात ईडीने केडीएमसीच्या आयुक्तांना पत्र लिहून 65 प्रकरणांची माहिती मागितली होती. डोंबिवलीतील 65 विकासकांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि रेराची बनावट कागदपत्र तयार केली आणि फसवणूक केली, असा आरोप आहे.

बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून बेकायदेशीर बांधकामं झाल्याचंही ईडीने त्यांच्या पत्रात म्हणलं आहे. याप्रकरणी तातडीने कागदपत्र सादर करावीत, असं ईडीने आयुक्तांना सांगितलं होतं.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करून त्याआधारे महारेरा प्राधिकरणाची नोंदणी प्रमाणपत्र बेकायदा इमारतींना मिळवून पालिका, महसूल विभाग आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या डोंबिवलीतल्या 65 बांधकामांप्रकरणी ईडीने चौकशीला सुरूवात केली.

केडीएमसीने 65 विकासकांच्या विरोधात मानपाडा आणि रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रती तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी ईडीने पत्राद्वारे केली.

First published:

Tags: KDMC