बेळगाव, 06 डिसेंबर : महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येऊ देणार नाही असा इशारा देण्याऱ्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आता महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर हा हल्ला झाला. महाराष्ट्राविरोधात कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे नारायण गौडा हे आज बेळगाव दौऱ्यावर आहेत.
बेळगाव - कन्नड रक्षण वेदिकेचा महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला, महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी pic.twitter.com/myznm2T9Aa
— News18Lokmat (@News18lokmat) December 6, 2022
महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे.या संघनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्तारोको केला. तसंच रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका, अशी मागणी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय. तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आणि खासदारांना बेळगावात प्रवेश दिला जाणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : ज्यांना भरभरून दिले त्यांनीच कोकणावर अन्याय केला, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा महाराष्ट्र सीमा प्रश्नावर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्रही गेली अनेक वर्षे वादात आहे. निवडणुकीचा सीमावादाशी काहीही संबंध नाही. दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये सामंजस्य आहे आणि त्यात बाधा येऊ नये. सुप्रीम कोर्टात एक केस आहे आणि मला जिंकण्याचा विश्वास आहे. निवडणुका डोळ्यासमोर आल्याशिवाय वाद होणार नाही. आम्ही आमच्या सीमा आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. महाराष्ट्रातील कन्नडिगांच्या संरक्षणासाठी सरकार तयार आहे असंही बसवराज बोम्मई यांनी म्हटलं.