Home /News /maharashtra /

CCTV VIDEO : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीसह घुसले चोर, मात्र तरीही कामगाराने केलं धाडस

CCTV VIDEO : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीसह घुसले चोर, मात्र तरीही कामगाराने केलं धाडस

दुपारच्या सुमारास तीन जण लुटीच्या उद्देशाने ज्वेलर्सच्या दुकानात घुसले.

कल्याण, 16 नोव्हेंबर : मलंगगड रोडवरील नांदीवली गाव येथील वैष्णवी ज्वेलर्स दुकानात भरदिवसा लूट करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी ही घटना घडली असून लूट करणारे 3 आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. दुपारच्या सुमारास तीन जण लुटीच्या उद्देशाने ज्वेलर्सच्या दुकानात घुसले. यापैकी एकाकडे रिव्हॉल्व्हरही होती. त्यामुळे दुकानात उपस्थित असणारे सर्वजणच घाबरले. मात्र अशा स्थितीतही दुकानातील एका कामगाराने चोरांना प्रतिकार केला आणि एका जणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. चोराला पकडताना झालेल्या झटापटीत एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या शस्त्रांसह झालेल्या या चोरीमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Crime news, Kalyan

पुढील बातम्या