मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्यात अवघ्या 5 महिन्यात हजारोंनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आकडा ऐकून बसेल धक्का

राज्यात अवघ्या 5 महिन्यात हजारोंनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आकडा ऐकून बसेल धक्का

 रामसिंहचे सोनी नावाच्या महिलेसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. साधारण वर्षभरापूर्वी सोनीचा भाऊ रामसिंहच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळून घेऊन गेला

रामसिंहचे सोनी नावाच्या महिलेसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. साधारण वर्षभरापूर्वी सोनीचा भाऊ रामसिंहच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळून घेऊन गेला

आज शेतकरी आत्महत्यांची (Farmers Suicide) आकडेवारी विधानसभेत (Assembly) सादर करण्यात आली आहे.

मुंबई, 24 डिसेंबर: एक मोठी बातमी (Big News) समोर येत आहे. राज्यात अवघ्या 5 महिन्यात 1076 शेतकऱ्यांनी (Farmers)आत्महत्या (Committed Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. आज शेतकरी आत्महत्यांची (Farmers Suicide) आकडेवारी विधानसभेत (Assembly) सादर करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर महिन्यातील ही आत्महत्यांची प्रकरणाची माहिती समोर आली आहे.

यावर्षी जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत 1076 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. 491 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे ही जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवली. तर 213 आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरवण्यात आले असून 372 आत्महत्यांची पडताळणी व्हायची आहे. त्यात 491 पैकी 482 जणांना मदतीच वाटप करण्यात आलं आहे.

हेही वाचा- भोंगळ कारभार..! कोरोना मृतांच्या यादीत चक्क 216 जिवंत व्यक्ती

कर्जबाजारीपणा, कर्जफेडीचा तगादा आणि कर्जाची परतफेड न केल्याने या आत्महत्या झाल्या असल्याचं माहिती मिळतेय. तसंच आस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांनी नापिकी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या कारणांमुळे आत्महत्या केली आहे.आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती सभागृहाला याबाबतची माहिती दिली आहे.

शेतकरी आत्महत्या आणि त्यांना मिळालेल्या नुकसान भरपाई बाबत विचारलेल्या तारांकित प्रश्नांना उत्तरे देताना ही आकडेवारी सभागृहासमोर मांडण्यात आली.

First published:

Tags: Farmer