मुंबई, 22 नोव्हेंबर : मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात झाली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. एका महिलेनं आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याविरोधात जितेंद्र आव्हाड कोर्टात धाव घेणार आहेत. याबाबतचे आव्हाड यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले. उद्या ह्या गुन्ह्यांविरुद्ध जेंव्हा मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा त्या पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरील अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात. म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हातवर करून मोकळे होऊन जातील. ह्याच्यात काय करावे हे सुचत नाहीये.
हे ही वाचा : शिवसेना कुणाची? दिल्लीत ठाकरे गटाकडून हालचालींना वेग, आजच ‘गेम’ होणार!
आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवा, कि ह्या वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी. अर्थात ह्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचा काय दोष आदेश कोण देते ठाण्यात हे महाराष्ट्राला माहीत आहे. अशा आशयाचे ट्वीट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे सरकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला आहे. यावर जितेंद्र आव्हाड आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतीत काय घडलं होत?
मागच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमावेळी गर्दीत आव्हाड यांनी एका महिलेला धक्का दिल्याप्रकरणी विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली.
हे ही वाचा : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’त आदित्य, पण बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी महाविकासआघाडी नाही, शिवसैनिक नाराज!
आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा आरोप या ४० वर्षीय महिलेनं केला आहे. महिलेनं तातडीनं याची माहिती पोलिसांनी दिली. तर पोलिसांनी महिलेला याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.