मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चिमुकल्यांना चॉकलेट देताना सावधान! जेलीने घेतला 9 महिन्याच्या बाळाचा जीव

चिमुकल्यांना चॉकलेट देताना सावधान! जेलीने घेतला 9 महिन्याच्या बाळाचा जीव

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्या चॉकलेट देत आहोत, तसेच ते चॉकलेट खाण्यायोग्य ते बाळ आहे की नाही, तसेच लहान वयाच्या पाल्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India

रत्नागिरी, 27 जानेवारी : रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतात. त्यामुळे आई वडील नातेवाईक त्यांना चॉकलेट घेऊन देतात. मात्र, रत्नागिरीच्या गुहागरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

9 महिन्याच्या बाळाच्या घशात जेलीचे चॉकलेट अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. श्वास घेता न आल्यामुळे बाळाचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गुहागरमधील साखरी आगर गावातील ही दुदैवी घटना घटना आहे. बाळाच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी गावातील डॉक्टरकडे नेले. मात्र, येथील डॉक्टरच्या सल्ल्यावरुन त्याला घोणसरे येथे नेत असताना रस्त्यातच या बाळाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी गुहागर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रिहांश तेरेकर असे मृत बाळाचे नाव आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्या चॉकलेट देत आहोत, तसेच ते चॉकलेट खाण्यायोग्य ते बाळ आहे की नाही, तसेच लहान वयाच्या पाल्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे, असे या आवाहन या घटनेनंतर केले जात आहे.

हेही वाचा - अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पुण्यात मित्राच्या पत्नीवर बलात्कार

मागच्या महिन्यात साताऱ्यातही घडली होती घटना -

मागच्या महिन्यात साताऱ्यात अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. एक वर्षाच्या चिमुकलीचा चॉकलेट घशात अडकून मृत्यू झाला होता. चॉकलेट घशात अडकल्याचं लक्षात आल्यानंतर आईने मुलीला रुग्णालयात नेलं. पण त्याआधीच मुलीचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या मुलीचं नाव शर्वरी सुधीर जाधव असं आहे. साताऱ्यात कर्मवीरनगरमध्ये ही घटना होती.

शर्वरीला शेजारी राहणाऱ्या लहान मुलीनं जेली चॉकलेट खायला दिलं होतं. शर्वरीने चॉकलेट गिळल्यानंतर ते घशात अडकलं. तेव्हा तिला खोकल्याचा त्रास सुरू झाला. यानंतर काही वेळातच शर्वरी बेशुद्ध झाली. जेव्हा आईच्या लक्षात ही बाब आली तेव्हा घराच्या शेजारी राहणाऱ्या देवबा जाधव यांच्या मदतीने शर्वरीला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयात शर्वरीला नेल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली. पण उपचाराआधीच एक वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. एक वर्षांच्या मुलीचा घशात चॉकलेट अडकून मृत्यू झाल्याने तिच्या आईने केलेला आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.

First published:

Tags: Death, Ratnagiri, Small child