नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 5 मार्च : परिस्थिती कितीही खडतर असली तरी इच्छा शक्तीच्या जोरावर आपण गगन भरारी घेऊ शकतो हे जालना जिल्ह्यातील तरुणानं दा्खवून दिलंय. जेमेतेम सातवीपर्यंत शेती, परिस्थिती इतकी साधारण की घरी दोन वेळा जेवणाची देखील भ्रांत.. पण या तरुणानं जिद्दीनं सारं आयुष्य बदलून टाकलंय. हा तरुण आता थेट कोट्यधीश झाला आहे. कसा झाला प्रवास? गंगाधर कुबरे असं या तरुणाचं नाव असून तो जालना जिल्ह्यातील चितळी पुतळी या गावातील प्रगतीशील शेतकरी आहे. एकेकाळी कुबरे कुटुंब अतिशय हलाखीचे जीवन जगत होते. पोटापाण्यासाठी संपूर्ण कुटुंब मुंबई शहरात गेले होते. तिथे सगळ्यांनी काबाडकष्ट करत आर्थिक स्थिरता आणली. आर्थिक स्थिरता आल्यावर त्यांनी गावातील शेतीमध्ये प्रयोग करण्याचे ठरवले. 2017 साली त्यांनी लातूर येथील एका नर्सरीमधून चंदनाची 300 रोपं आणली. या रोपांची आपल्या एक एकर शेतामध्ये लागवड केली. या लागवडीला त्यांच्या आईचा सुरुवातीला विरोध होता. पण त्यांनी आईला समजावून सांगत काम सुरू केले. Success Story : नोकरी सोडून गावातच सुरु केला कॅफे, आता होतीय लाखोंची कमाई, Video लागवड केल्यानंतर पाच वर्ष त्यांच्या आईने गावी या झाडांची जोपासना केली. तर कुबारे मुंबई वरून दर आठवड्याला घरी येऊन झाडांची प्रगती पाहात असत. चंदन शेतीसाठी पहिल्या वर्षी त्यांना साडेतीन लाखांचे खर्च आला. यात रोपांसाठी ६० हजार तर कूपनलिका आणि पापिलाईन साठी ३ लाख रुपये खर्च आला. चार वर्षांपर्यंत त्यांनी यात विविध आंतरपिके घेतली. चंदनाची ही झाडे परजीवी आहेत. त्यामुळे यामध्ये कडुनिंबाच्या झाडांची देखील लागवड करण्यात आली आहे.
त्याच्या एक एकर शेतीममधील 300 चंदनाच्या झाडांची किंमत आता तीन कोटींच्या घरात आहे. त्याचबरोबर कुबरे यांनी शेतीचे वेगवेगळे प्रयोगही केले आहेत. मुंबईतील गॅरेज मोठ्या भावाकडे सोपवून ते 2021 साली गावाकडे परतले. आता ते पूर्णवेळ शेती करतात. मुळची मुंबईकर असलेली त्यांची पत्नीही या कामात त्यांना पूर्ण मदत करत आहे. आता त्यांच्या शेतात चांदानाबरोबर कापूस, हरभरा, बियाणेसाठीचा कांदा ही पिकं आहेत.