जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वडिलांच्या कष्टाचं चीज, बांधकाम मजुराच्या दोन्ही मुली झाल्या पोलिस कॉन्स्टेबल, पाहा Video

वडिलांच्या कष्टाचं चीज, बांधकाम मजुराच्या दोन्ही मुली झाल्या पोलिस कॉन्स्टेबल, पाहा Video

वडिलांच्या कष्टाचं चीज, बांधकाम मजुराच्या दोन्ही मुली झाल्या पोलिस कॉन्स्टेबल, पाहा Video

बांधकाम मजुराच्या दोन्ही मुली पोलिस कॉन्स्टेबल झाल्या आहेत. या बहिणींनी मिळवलेलं हे यश सर्वांनाच प्रेरणा देणारं आहे.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

    नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 20 एप्रिल : जालना शहरातील समर्थ नगर इथे साईटवर राहणाऱ्या बांधकाम मजुराच्या दोन्ही मुली पोलिस कॉन्स्टेबल झाल्या आहेत. या दोन्ही बहिणीचे आई वडील बांधकाम मजूर आहेत. दोन वर्षापूर्वीच त्यांच्या 19 वर्षीय भावाचे अपघाती निधन झाले. निधनानंतर सगळे कुटुंब नैराश्यात होते. मात्र, मुलींनी मिळवलेल्या असाधारण यशाने कुटूंबाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.  जालना  जिल्ह्यातल्या बहिणींनी मिळवलेलं हे यश सर्वांनाच प्रेरणा देणारं आहे. जालना शहरातील समर्थ नगर इथे साईटवर प्रभाकर जाधव राहतात. बांधकाम मजूर म्हणून प्रभाकर आणि त्यांच्या पत्नी काम करतात. भारती प्रभाकर जाधव आणि दिपाली प्रभाकर जाधव या त्यांच्या दोन मुली आहेत. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना प्रभाकर यांनी कष्ट करून दोन्ही मुलींना शिकवले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारती आणि दिपाली पोलीस कॉन्स्टेबल भरतीची परीक्षा उत्तीर्ण केलीय. विशेष म्हणजे मोठी मुलगी भारती हिने लग्न झाल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण करत खाकी वर्दी मिळवली आहे. तिचे पती चंद्रकांत गायकवाड यांनी तिला भक्कम साथ दिली. यामुळेच भारती पोलिस भरतीची तयारी करून हे यश मिळवू शकली. या बहिणींची ठाणे पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल म्हणून निवड झालीय.

    News18लोकमत
    News18लोकमत

    शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला आमचे लहानपणा पासूनच पोलिस होण्याचे स्वप्न होते. पण आमची परिस्थिती खूपच नाजूक होती. आई वडील बांधकाम मजूर आहेत. त्यांना कधी काम मिळते तर कधी मिळत नाही. आमच्याकडे शेती देखील नाही. त्यामुळे शिक्षणासाठी फार संघर्ष करावा लागला. अनेकदा वही पेन खरेदी करण्यासाठी देखील पैसे नसायचे. माझे लग्न झाल्यानंतर मी माझ्या पतीला माझे पोलिस होण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. त्यांनी मला पाठिंबा दिला. अनेकांनी त्यांना नावे ठेवली. मुली कुठे शिकणार आहेत. लग्न झाल्यावर कुठे शिकत असतात का असे टोमणे मारले. पण माझ्या पती यांनी माझी साथ दिली. अवघ्या सहाच महिन्यात पहिल्याच प्रयत्नानंतर माझी आणि माझ्या बहिणीची निवड झाली. यामुळे खूप छान वाटतं, असं भारती जाधव यांनी सांगितले. मुलींचा अभिमान वाटतो मी बांधकाम मजूर म्हणून काम करतो. आमचा कैकाडी समाज नेहमी भटकंती करत असतो. आम्ही देखील जिथे काम मिळेल तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये राहतो. मुलींना शिक्षणासाठी अनेक अडचणी आल्या. पण आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. जेवढं शक्य होईल तेवढं बळ दिलं. आज दोन्ही मुली पोलिस झाल्यानं दोन्ही मुलींचा खूप अभिमान वाटतो, असं मुलींचे वडील प्रभाकर जाधव यांनी सांगितले.

    शेणाच्या पाट्या उचलून आईनं शिकवलं, बहिण-भावांनी पोलीस होऊन फेडले माऊलीचे पांग! पाहा Video

    पूर्ण पाठिंबा दिला  मला जेव्हा माझ्या पत्नीने पोलिस होण्याचे आपले स्वप्न आसल्याचे सांगितले. तेव्हा आम्ही चर्चा करून तिला पूर्ण पाठिंबा देण्याचे ठरविले. तिने कठोर मेहनत करून तिचे स्वप्न साकार केल्याने आता सगळ्यांनाच छान वाटतंय, असं भारतीचे पती चंद्रकांत गायकवाड यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात