मुंबई, 15 मार्च: भारतीय संरक्षण दलाचा जगात चौथा क्रमांक लागतो. संरक्षण दलाचे भूदल, वायूदल आणि नौदल असे तीन मुख्य प्रकार पडतात. या तिन्ही दलांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासते. सध्या नौदलाच्या टेक्निकल विभागामध्ये काही अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगनं (यूपीएससी) संरक्षण मंत्रालयातील नौदलाच्या नवी दिल्ली येथील एकात्मिक मुख्यालयात सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. यूपीएससीनं संरक्षण मंत्रालय 2023 भरतीची ही अधिकृत जाहिरात जारी केली आहे. जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप 'अ' राजपत्रित (नॉन-मिनिस्ट्रियल) या वर्गीकरणाअंतर्गत सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदाच्या एकूण पाच जागा रिक्त आहेत. यापैकी तीन जागा अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी आहेत. 'स्टडी कॅफे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
संरक्षण मंत्रालयातील सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदासाठी ऑनलाइन भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2023 आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत वेतनश्रेणी स्तर -11 नुसार सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाईल. शिवाय, त्यांना केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगातील सीपीसीतील मॅट्रिक्स एनपीएचा लाभही मिळेल. म्हणजेच या उमेदवारांना 67 हजार 700 ते 2 लाख 8700 हजार रुपये मासिक वेतन मिळेल.
10वी पास आहात ना? मग ही सुवर्णसंधी सोडूच नका; भारतीय पोस्टात सरकारी नोकरी; करा अप्लाय
नोट-I: यूपीएससीनं जारी केलेल्या संरक्षण मंत्रालय 2023 भरती अधिसूचनेनुसार, सर्व पात्र अर्जदारांनी, जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप 'अ' राजपत्रित (नॉन-मिनिस्ट्रियल) या वर्गीकरणाअंतर्गत सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदांसंदर्भात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे.
नोट-II: सर्व इच्छुक उमेदवारांनी यूपीएससी ओआरए लिंकवर ओआरएप्रक्रिया पार पाडताना ऑनलाइन भरती अर्जांमधील किमान पात्रता आणि अनुभव नमूद केला पाहिजे.
पोस्टचं नाव, संख्या आणि स्वरूप: संरक्षण मंत्रालयातील सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदांसाठी एकूण पाच जागा रिक्त आहेत. त्यापैकी तीन जागा अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी आहेत. सर्व पाच रिक्त जागांवर निवडलेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळेल.
1-2 नव्हे 'या' गावातील सर्वच जण आहेत YouTuber; नोकरी नाही तर व्हिडीओ बनवून कमवतात पैसे
पोस्ट क्लासिफिकेशन: जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप 'अ' राजपत्रित (नॉन-मिनिस्ट्रियल)
पोस्टिंगचं स्थान: संरक्षण मंत्रालय (नौदल) एकात्मिक मुख्यालय, नवी दिल्ली
पे स्केल: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत वेतनश्रेणी स्तर स्तर -11 नुसार सीनिअर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 67 हजार 700 ते 2 लाख 8700 हजार रुपये मासिक वेतन मिळेल.
वयोमर्यादा:
1) 30 मार्च 2023 रोजी अनारक्षित श्रेणीतील अर्जदाराचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावा.
2) भारत सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांनुसार केंद्र सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशात सरकारी नोकरीवर असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत आहे.
पात्रता:
A) शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग शाखांमध्ये बॅचलर पदवी किंवा याच्याशी समकक्ष शिक्षण आवश्यक.
B) अनुभव: जहाजांचे डिझाईन/इन्स्टॉलेशन/बांधणी यामध्ये पाच वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव गरजेचा.
नोट: गरज पडल्यास, उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची पात्रतेच्या अटी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विवेकबुद्धीनुसार शिथिल केल्या जातील.
निवड पद्धती: पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक शुल्क:
I) ओपन/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांना 25 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल.
II) आरक्षित उमेदवार (एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी) आणि कोणत्याही श्रेणीतील महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट आहे.
इतर आवश्यक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी upsconline.nic.in या वेबसाईटवर लॉग इन करावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams