जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna News : शेतीतील वेस्टेजमधूनही होणार कमाई, प्रदूषणातूनही सुटका करण्याचा सापडला मार्ग, Video

Jalna News : शेतीतील वेस्टेजमधूनही होणार कमाई, प्रदूषणातूनही सुटका करण्याचा सापडला मार्ग, Video

Jalna News : शेतीतील वेस्टेजमधूनही होणार कमाई, प्रदूषणातूनही सुटका करण्याचा सापडला मार्ग, Video

Jalna News : पिकाची कापणी झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या वेस्टेज मधून तुम्ही पैसे देखील कमवू शकतात. ते कसे जाणून घ्या.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

    नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 22 फेब्रुवारी : शेतीमध्ये पिकाची कापणी झाल्यानंतर राहिलेले वेस्टेज पेटवून दिल्या जाते. यामुळे हवेचे प्रदूषण तर होते. यासोबतच वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा खर्च देखील येतो. त्यामुळे शेतमधून निघणारी वेस्टेज ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या असते. मात्र, आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण शेती मधून निघणाऱ्या वेस्टेजवर प्रक्रिया करणारी व्हर्च्युअल ग्रीन एनेर्जी  ही कंपनी जालना जिल्ह्यातील नेर गावात सुरु झाली आहे. पिकाची कापणी झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या वेस्टेज मधून तुम्ही पैसे देखील कमवू शकतात. कसे ते पाहुयात. कधी सुरु झाली कंपनी? जिल्ह्यातील नेर गावात 2021 मध्ये शेतातील बायो वेस्टेजवर प्रक्रिया करून ब्रॅकेट्स बनवण्याची कंपनी सुरू करण्यात आली. राहुल देशमुख हे या कंपनीचे मालक आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यांना याबाबत फारशी माहिती नसल्याने इथे जम बसविण्यास खूप मेहनत घ्यावी लागल्याचे कंपनीचे सुपरवायझर सब्बिर सय्यद यांनी सांगितले.

    News18लोकमत
    News18लोकमत

    प्रदूषण देखील होत नाही शहरामध्ये मोठ मोठ्या कंपन्यांचे बॉयलर पेटवण्यासाठी कोळसा वापरला जायचा. मात्र, कोळशाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. तसेच कोळशाचे प्रदूषण वाढते. शेतीमधील बायो वेस्टज मधून बनवलेले हे ब्रॅकेट्स कोळस्याला स्वस्त पर्याय तर आहे. सोबतच यामुळे प्रदूषण देखील होत नाही असं सब्बीर सय्यद सांगतात. शेतकऱ्यांना काय फायदा? जालना जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, गहू, बाजरी ही प्रमुख पिके घेतली जातात. या सगळ्या पिकाधून निघणारे वेस्टेज शेतकरी इथे नेर येथील या कंपनीत आणून त्याची विक्री करू शकतात. यातून आर्थिक फायदा मिळवू शकतात.

    शेतकऱ्याचा नादच खुळा! दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी 2 एकरात बनवले शेततळे, Video

    वेस्टेजला काय दर मिळतो? शेतातील वेस्टेजला इथे 2500 ते 3000 रुपये टन एवढं दर मिळतो. शेतकरी इथे एक ट्रॉली वेस्टेज आणून 4 ते 5 हजार रुपये कमवू शकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात