जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna News : 9 वर्षांचा बालशाहीर गातोय शिवरायांचा पोवाडा, ऐकूण येईल अंगावर शहारा, Video

Jalna News : 9 वर्षांचा बालशाहीर गातोय शिवरायांचा पोवाडा, ऐकूण येईल अंगावर शहारा, Video

Jalna News : 9 वर्षांचा बालशाहीर गातोय शिवरायांचा पोवाडा, ऐकूण येईल अंगावर शहारा, Video

अवघ्या 9 वर्षांचा शिवराज छत्रपती शिवाजी महाराजांचा दमदार पोवाडा गातो.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 17 जून :  आपल्या राज्याला शाहिरी ची मोठी परंपरा लाभली आहे. रामानंद उगले, बाबासाहेब देशमुख यांच्यासारखे शाहीर आपल्या कानाना त्यांच्या पहाडी आवाजाने मंत्रमुग्ध करतात. त्याच परंपरेला पुढे नेत जालना शहरातील शिवराज बरसाले हा बाल शाहीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवड्यांचे उत्तम सादरीकरण करून लक्ष वेधून घेतोय. शिवराजन शाहीर होण्याचा आगळावेगळा मार्ग का निवडला? छत्रपती शिवरायांच्या विचारांचे संस्कार त्याच्या बालमनावर कुणी घडवून आणले? हे पाहूया कशी झाली सुरूवात? जालना शहरातील मुक्तेश्वरद्वार परिसरात राहणारे बरसाले कुटुंब मूळचे घनसावंगी तालुक्यातील अंतर वाली या गावचे. शिवराज याचे वडील शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांना स्वतः ला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाडे, गाणी ऐकण्याचा छंद आहे. ते लग्नसमारंभात शिवराय यांनी आरती आणि शिवगर्जना म्हणायचे. त्यांच्या सोबत असलेल्या शिवराज यांच्यावर देखील हेच संस्कार रुजत गेले.

News18लोकमत
News18लोकमत

कुठलेही क्लास न लावता व संगीताचे शिक्षण न घेता शिवराज पोवड्याचे उत्तम सादरीकरण करतोय. त्याच्या या छंदाला आई वडिलांचा देखील पाठिंबा आहे. शहरात होणाऱ्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते त्याला घेऊन जातात. या ठिकाणी संधी मिळाल्यास तो आपले सादरीकरण करतो. अंगावर शहारे आणणारे पोवाडे सादर करणाऱ्या शिवराज याला भविष्यात मोठा शिवशाहीर होण्याची इच्छा आहे. जालन्यातील या मंदिरात रॅाक बॅंड स्टाईल शिवभजन, हा Video पाहून तुम्ही व्हाल तल्लीन ‘शिवराजला वयाच्या पाचव्या वर्षापासून शिवरायांचे पोवाडे गाण्याची आवड लागली. मला स्वतः ला देखील संभाजी महाराज, शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ याचे गीते ऐकण्याची आवड आहे. मोबाईलवरच तो पोवाडे ऐकून गायला लागला. माझ्याकडून होईल तेवढं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मी केला. आज तो चांगल्या पध्दतीने महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोचवत आहे याचा आनंद आहे,’ अशी भावना शिवराजचे वडील गोपीचंद बरसाले यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात