जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna News : ‘लेकरांसह गावोगावी फिरलो, तेव्हा लोक आदराने ऐकायची, आज कुणी विचारेना’ Video

Jalna News : ‘लेकरांसह गावोगावी फिरलो, तेव्हा लोक आदराने ऐकायची, आज कुणी विचारेना’ Video

Jalna News : ‘लेकरांसह गावोगावी फिरलो, तेव्हा लोक आदराने ऐकायची, आज कुणी विचारेना’ Video

बहुरूपी समाज आपली कला आणि संस्कृती जोपासत असून गावागावांत जाऊन विनोदी शैलीत लोकांचे मनोरंजन करतो.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 15 जून : डोक्यावर पोलिस अधिकाऱ्यांसारखी टोपी आणि अंगात खाकी वर्दी चढवून गावोगावी आपल्या चपखल शब्द आणि वाक्य रचनेतून लोकांना हसायला लावणारा बहुरूपी समाज आजही आपली परंपरा जोपासताना दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून बहुरूपी समाज अस्तित्वात आहे.  शिवरायांच्या काळात गुप्त पद्धतीने माहिती मिळवण्याचे काम हा समाज करायचा. शिवरायांच्या काळात या बहुरूपी समाजाला राजाश्रय होता. आजही बहुरूपी समाज आपली कला आणि संस्कृती जोपासत असून गावागावांत जाऊन विनोदी शैलीत लोकांचे मनोरंजन करत आहे. नागरिकांना हसवतात विजय यापैकीच एक अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील बहुरूपी विजय साहेबराव सावंत हे आहेत. विजय हे पोलिसांची वर्दी घालून गावोगावी बहुरूपी कला सादर करतात ते कधी पोलिस हवालदार तर कधी पोलिस इन्स्पेक्टर तर कधी वकिलाच्या रूपात नागरिकांना हसवतात. घरोघरी आणि दुकानात कला सादर करून पैसे मागतात. अन् त्यावरच आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात.

News18लोकमत
News18लोकमत

म्हणून करावे लागतेय मनोरंजन बहुरूपी समाजाकडे असलेली कला हेच त्यांचे जीवन जगण्याचे साधन आहे. त्यामुळे वर्षभर दर मुक्काम दर कोस करत विजय याचे कुटुंब फिरस्तीवर असते. मिळेल त्या जागेवर राहायचे. दिवसभर लोकांचे मनोरंजन करायचे. लोकांनी दिलेल्या दहा वीस रुपये जमा करून त्यावरच उदरनिर्वाह करायचा.   Pune News : आई सोडून गेली, आजी शेतीत काम करून सांभाळते; प्रमोदचं पखवाज ऐकून कराल कौतुक, Video लोक किंमत देत नाहीत आमची बहुरूपी कला पारंपारिक असल्यामुळे आम्हाला गावी गावी फिरण्यासाठी जावे लागते. पहिले आमच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतेही साधनं नव्हते. त्यामुळे आम्ही आमची कला सादर करून उदरनिर्वाह करायचो. पूर्वी सोंग निघायचे. लेकरं बाळासहित गावोगावी भटकंती करून आम्ही ही कला सादर करत. पूर्वी मनोरंजनाची साधने नव्हती त्यामुळे आमच्या कलेच खूप महत्त्व होत. लोक खूप द्यायची आता मात्र लोक तेवढी किंमत देत नाहीत. तरीदेखील आम्ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून पिढ्यान् पिढ्यान् चालत आलेली परंपरा जपत असल्याचे बहुरूपी विजय साहेबराव सावंत यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalna , Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात