मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकऱ्यांना 3 महिन्यात लखपती करणाऱ्या आरोग्यवर्धक बिया, पाहा काय आहे लागवडीचा मंत्र, Video

शेतकऱ्यांना 3 महिन्यात लखपती करणाऱ्या आरोग्यवर्धक बिया, पाहा काय आहे लागवडीचा मंत्र, Video

X
जालना

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने या आरोग्यवर्धक बियांची लागवड केली आहे. या शेतीतून लाखोंचे उत्पादन होते.

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने या आरोग्यवर्धक बियांची लागवड केली आहे. या शेतीतून लाखोंचे उत्पादन होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalna, India

    नारायण काळे, प्रतिनिधी

    जालना, 1 एप्रिल : हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत काही शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील शेतकरी शिरीष वझरकर यांनी केला आहे. आरोग्यवर्धक चिया बियांच्या लागवडीतून त्यांनी शेतकऱ्यांना वेगळी दिशा दाखवली आहे. जालन्यामध्ये नुकत्याच झालेल्या कृषी प्रदर्शनात या पिकाच्या लागवडीबाबत माहिती देण्यासाठी तसेच चिया बिया विक्रीसाठी त्यांनी स्टॉल लावला होता. काय आहेत या चीया बियांचे आरोग्यवर्धक फायदे? कशी केली जाते याची शेती त्यांच्याकडून जाणून घेऊयात.

    किती होते उत्पादन?

    जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रांजणी गावातील शेतकरी शिरीष वझरकर यांनी चिया बियांची लागवड केली आहे. एक एकरात प्रतिकिलो 1200 रुपयेप्रमाणे अडीच किलो चिया बिया त्यांनी लावल्या आहेत. या शेतीला फवारणी खते असा कोणताच खर्च येत नाही. केवळ तीन महिन्यांत सहा पाणी देऊन एकरी साधारणतः 4 ते 5 क्विंटल उत्पादन होते. सध्या चिया बियांना प्रतिक्विंटल 1 लाख 20 हजार रुपये भाव आहे. 3 हजार रुपये खर्चात जवळपास 5 लाख रुपये उत्पन्न होते, असं शेतकरी शिरीष वझरकर सांगतात.

    कशी केली जाते शेती?

    चिया बिया कोणत्याही प्रकारची माती आणि हवामानात उगवता येतात. तथापि, चांगल्या निचऱ्याची हलकी आणि वालुकामय जमीन योग्य आहे. बी पेरणीसाठी आपण कांदा बियाणे पेरणीच्या यंत्राचाही यासाठी वापर करू शकतो. लागवडीनंतर त्याला दोन वेळा तुषार सिंचन व त्यानंतर दांडाने पाणी द्यावे लागते. यासाठी फवारणी तसेच खते यासाठी कोणताच खर्च नाही. शिवाय यातून वन्यप्राणीही फिरकत नसल्याने शेतकऱ्यांना संरक्षणासाठी कोणतीही अशी विशेष व्यवस्था करावी लागत नाही. या पिकाच्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांना अवघ्या तीन महिन्यांत 4 ते 5 क्विंटल एकरी उत्पादन सहज मिळते.

    'ही' औषधी वनस्पती करणार शेतकऱ्यांना लखपती, जालन्यातील शेतकऱ्यानं सांगितला लागवडीचा मंत्र, Video

    शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

    महिन्याच्या दृष्टीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे त्याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य आहेत. एक एकरात चिया बियाणे पिकवायचे असेल तर सुमारे 2 ते 3 किलो बियाण्याचा वापर करू शकतो. कमी खर्चात अधिक फायदे देणारे हे पीक आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल. चिया यामध्ये ओमेगा सीड असल्यामुळे जनावरांचा या पिकाला उपद्रव होत नाही. शिवाय कोणतेही नुकसान होत नाही. नगर येथील एका शेतकल्याने याची लागवड केली होती. त्यांच्याकडून माहिती घेत मी एका एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. वजन कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धक चिया बियांची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असंही शिरीष वझरकर सांगतात.

    First published:
    top videos

      Tags: Agriculture, Farmer, Jalna, Local18