जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalna News : वटवृक्षांच्या पुर्नलागवडीचा ‘जालना पॅटर्न’ शहरात सुरूय खास प्रयोग, Video

Jalna News : वटवृक्षांच्या पुर्नलागवडीचा ‘जालना पॅटर्न’ शहरात सुरूय खास प्रयोग, Video

Jalna News : वटवृक्षांच्या पुर्नलागवडीचा ‘जालना पॅटर्न’ शहरात सुरूय खास प्रयोग, Video

जालना शहरात वटवृक्षांच्या पुर्नलागवडीचा खास प्रयोग सुरू आहे. त्यामुळे अनेक झाडांना संजीवनी मिळणार आहे.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 17 जून :  आयुष्यात हरल्यानंतर अनेकदा नकारात्मक विचार आपल्या मनात घर करतात. अशाच नकारात्मक विचारांना मागं टाकतं नवनिर्मितीचा स्फुलिंग चेतवणारा वटवृक्ष जालनाकरांचं आकर्षण ठरतोय. पारशी टेकडीवर गेल्यावर्षी पुर्नलागवड केलेला वटवृक्ष चांगलाच बहरलाय. शहरातील अनेक नागरिक या वटवृक्षाला भेट देऊन त्यापासून जगण्याची प्रेरणा मिळवत आहेत. या वटवृक्षाबरोबरच आणखी 12 वटवृक्षांची या टेकडीवर पुर्नलागवड करण्यात येणार आहे. काय आहे त्यामागील उद्देश पाहूया… काय आहे प्रकल्प? जालना- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या बदनापूर येथे गेल्यावर्षी जुलै महिन्यात एका व्यक्तीने घराच्या भिंतीला अडथळा निर्माण करणाऱ्या वटवृक्षाची रितसर परवानगी घेऊन वृक्षतोड सुरू केली होती. वटवृक्षाची होत असलेली तोड जालना शहरातील उद्योजक आणि पर्यावरणप्रेमी सुनील रायठठ्ठा यांना पाहवली नाही. त्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना संपर्क साधला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत ही वृक्षतोड थांबवण्याचे आदेश दिले.

News18लोकमत
News18लोकमत

रायठठ्ठा यांनी दरम्यानच्या काळात तोडण्यात आलेल्या वटवृक्षाचे महाकाय खोड हे पारसी टेकडीवर नेऊन तेथे त्याची पुनर्लागवड करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांपुढे ठेवला होता. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर त्याची पारशी टेकडीवर पुर्नलागवड करण्यात आली. पंक्चरवाल्याची मुलगी होणार डॉक्टर, पाहा मिसबाहच्या यशाची Inside Story, Video पारशी टेकडीवर या वटवृक्षाला जवळपास सात महिने रोज 1 हजार लिटर टँकरनं पाणी देण्यात आलं. त्याचबरोबर त्याला खतही देण्यात आले. आठ महिन्यांच्या परिश्रमानंतर हा वटवृक्ष पुन्हा बहरला असून त्याला पालवी फुटली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्हाधिकारी राठोड यांनी बदनापूरच्या तहसील कार्यलयातही एका वटवृक्षाची पुर्नलागवड केली. तो प्रयोग देखील यशस्वी झालाय. आणखी वटवृक्षांना मिळणार संजीवनी राजूर ते भोकरदन या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरु आहे.  या कामामुळे या मार्गावरील महाकाय वृक्षांची कत्तल करण्यात आलीय. कत्तल झालेले 11 वटवृक्ष आणि 3 पिंपळाची लवकरच पारशी टेकडीवर पुर्नलागवड करण्यात येणार आहे. पारशी टेकडीवर सुरू असलेला हा प्रकल्प पाहण्यासाठी अनेक नागरिक येत असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक उदय शिंदे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात