मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Success Story : जालन्यातील तरुणी बनली फॅशन विश्वात ब्रँड, जगभरात होतीय कपड्यांची निर्यात, Video

Success Story : जालन्यातील तरुणी बनली फॅशन विश्वात ब्रँड, जगभरात होतीय कपड्यांची निर्यात, Video

X
Jalna

Jalna News : रेवती काकड या तरूणीनं फॅशन डिझायनिंग क्षेत्रात स्वत:चा ब्रँड तयार केला आहे.

Jalna News : रेवती काकड या तरूणीनं फॅशन डिझायनिंग क्षेत्रात स्वत:चा ब्रँड तयार केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalna, India

    नारायण काळे, प्रतिनिधी जालना

    जालना, 17 मार्च : सध्याच्या काळात बऱ्याच महिला ह्या सुंदर नक्षीकाम केलेले भरतकाम केलेले कपडे परिधान करत असतात. या कपड्यांकडे महिलांचा ओढा अधिक असतो. यामुळेच जालना शहरातील रेवती काकड या तरूणीने फॅशन डिझाईनचे शिक्षण पूर्ण करून स्वतः चा रेशमी कापडावर नक्षीकाम, भरतकाम करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. रेशमी कापडावर नक्षीकाम भरतकाम केलेले हे कपडे महाराष्ट्रात आणि देशात तर जात आहेतच. त्याचबरोबर विदेशातही या कपड्यांना मोठी मागणी आहे.

    कधी झाली सुरुवात?

    फॅशन डिझायनर तसेच कपडा उद्योगातील शिक्षण पूर्ण करून ग्रामीण कलाकृतीला चालना देण्यासाठी जालन्याच्या रेवती काकड तरूणीने काही वेगळे करण्याचा मानस ठेवत महाराष्ट्रीयन परंपरेची ओळख, कलाकुसर कपड्यांवर देण्याला 2021 मध्ये सुरूवात केली. कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झालेल्या स्थितीत ऑनलाइन प्रचाराची जोड मिळाली. विविध संकटावर मात करून जिद्द तसेच मेहनतीच्या बळावर जालन्यातील रेवती काकड या तरुणीने साता समुद्रापार ग्रामीण कला पोहोचवली आहे. आज मलेशिया, कॅनडा, अफ्रिका या देशांत रेवतीच्या भरतकाम, नक्षीकाम ही कलाकुसर केलेल्या साड्या, ब्लाऊज पोहोचवत आहेत.

    तरुणींनी याचा फायदा घ्यावा

    साडी, ब्लाऊज यावर कशा प्रकारे महाराष्ट्रीयन ओळख देता येईल यावर विविध संस्कृतीचा अभ्यास केला. यासाठी नक्षीकाम करणाऱ्या महिला तसेच पुरूषांची निवड करून मागणीप्रमाणे भरतकाम, नक्षीकाम केलेले वस्त्र सातासमुद्रापार पोहोचवत आहे. जालन्यातील जवळपास 27 महिलांना या तरुणीने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आज 2 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत किंमत असलेली कलाकुसर सर्वत्र पसरवत आहे. तरूणी, महिलांना कलाकुसरची कला अवगत असेल तर त्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार आहे. जिल्हाभरातील तरुणींनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन रेवती काकडने केले आहे.

    Gudi Padwa 2023 : नऊवारी नेसून मराठमोळ्या पद्धतीनं साजरा करा पाडवा, पाहा तुम्हाला कोणती साडी आवडतेय? Video

    कपड्यांना मागणी

    महाराष्ट्रीयन कलेस मागणी आपल्या महाराष्ट्राची परंपरा ही आपली ओळख आहे. ही कला आजच्या काळात फॅशनच्यामाध्यमातून देण्याचे काम केले जात आहे. शिवाय महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होत आहे. आंध्रप्रदेश, चेन्नई, कोईंबतूर, हैदराबाद, गोवा पाँडिचरी तसेच राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद या ठिकाणाहूनही डिझाईन केलेल्या कपड्यांना मागणी होत आहे , असं रेवती काकड हिने सांगितले.

    First published:

    Tags: Jalna, Local18, Success stories