नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 7 जून : कोणतंही यश हे एखाद्या भागाची मक्तेदारी नाही. संधी मिळाली की मागास समजल्या जाणाऱ्या भागातील विद्यार्थी देखील यश मिळवू शकतात. मराठवाड्यातील जालना शहरातल्या विद्यार्थ्यांनी देखील हे दाखवून दिलंय. जालनामधील 9 विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठाची तब्बल 5 कोटींची स्कॉलरशिप मिळालीय. या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात जालना शहरानं मोठं यश मिळवलंय. कुणाला मिळाली फेलोशिप? जालनामधील आयसीटी म्हणजे institute of chemical technology या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलंय, संपूर्ण देशात रसायन तंत्रज्ञान संस्था या फक्त 3 आहेत. त्यामध्ये जालनामधील या संस्थेचा समावेश होतो. 2018 साली ही संस्था सुरू झाली. या संस्थेमधील पहिली बॅच यावर्षी पास आऊट होतीय. पहिल्याच वर्षी येथील 9 विद्यार्थ्यांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये फेलोशिप मिळवलीय.
या 9 विद्यार्थ्यांपैकी हर्ष दर्जी याची अमेरिकेतील तब्बल 4 विद्यापीठांनी संशोधनासाठी निवड केली. त्यापैकी त्यानं मिनिसोटा विद्यापीठाची निवड केली. तर आयुष देवरेची जॉर्जिया युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलजीमध्ये निवड झालीय. ही निवड कशी झाली याबाबत महत्त्वाची माहिती आयुषनं दिली. कशी झाली निवड? ‘आमच्या कॉलेजमध्ये बीटेक आणि एमटेक मिळून पाच वर्षांचा एकत्र अभ्यासक्रम आहे. यावर्षी आमचा हा अभ्यासक्रम पूर्ण झाला. आम्ही पीएचडीसाठी अमेरिकन विद्यापीठात अर्ज केला होता. त्या विद्यापीठाच्या नियमानुसार आम्ही अर्ज भरले. प्रत्येक विद्यापीठ आपल्याकडं आलेल्या अर्जाची छाननी करतं. त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड होते. विद्यार्थ्यांच्या, प्रोफाईलनुसार त्याला किती फेलोशिप द्यायची याचा निर्णय विद्यापीठ घेतं, ’ असं आयुषनं सांगितलं. 50 लाखांचे पॅकेज असलेल्या सॅाफ्टवेअर इंजिनिअरने दिली UPSC ची परीक्षा, अखेर निकाल आला Video या विद्यार्थ्यांना विदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी फेलोशिप मिळाली आहे. प्रत्येक विद्यापीठाची प्रवेश प्रक्रियेची पद्धत वेगळी असते. साधारण 15 सप्टेंबरच्या आसपास त्यांच्या पोर्टलवर प्रवेश अर्ज उपलब्ध होतात. त्यामधील सूचनेनुसार अर्ज करायचा असतो. हा अर्ज भरताना आम्हाला कॉलेजकडून मदत मिळाली, अशी माहिती या संस्थेनं दिलीय. इंटिग्रेटेड मास्टर्स इन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम खूप नावीन्यपूर्ण आहे. पहिल्यात बॅचमधील विद्यार्थ्यांची निवड झाल्यानं त्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. आम्ही या विद्यार्थ्यांवर केलेली मेहनत देखील सार्थ ठरल्याचं समाधान आहे. या निवडीमुळे आयसीटी आणि जालना या दोघांचंही नाव मोठं झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भले शाब्बास! 12 वर्षानंतर दिली बारावीची परीक्षा, निकाल असा लागला की सगळेच करतायत कौतुक निवड झालेले विद्यार्थी हर्ष दर्जी- व्हिस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी, फरहान शेख - जॉन हाफकिन्स युनिव्हर्सिटी, प्रकाश खंडागळे युनिव्हर्सिटी ऑफ बफेलो, अली असगर - कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी , आयुष देवरे - जॉर्जिया युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, उर्वी परळीकर- युनिव्हर्सिटी ऑफ कोलॅरॅंडो, कृतार्थ पंडित - ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी, सिद्धांत उंडे - कॅनफील्ड युनिव्हर्सिटी, विष्णू प्रदीप- कोलंबिया युनिव्हर्सिटी.