जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती प्रकरण; त्या 5 पोलिसांचं निलंबन मागे

रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती प्रकरण; त्या 5 पोलिसांचं निलंबन मागे

रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती प्रकरण; त्या 5 पोलिसांचं निलंबन मागे

Policemen suspenstion revoke: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाची झडती घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जालना, 19 जून: केंद्रीय राज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या त्या पाचही पोलिसांचे निलंबन अखेर मागे (suspension of 5 policemen revoke) घेण्यात आले. ही कारवाई राजकीय दबावापोटी झाल्याचा आरोप करीत हे निलंबन मागे घेण्याची मागणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांना भेटून केली होती. पोलिसांचे निलंबन मागे घेतल्याने आता या प्रकरणावरून दानवे-खोतकर वाद आता पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय. जालन्यातील जाफराबाद येथील एका स्थानिक पत्रकारावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान,याप्रकरणातील आरोपी दानवे यांच्या जनसंपर्क कार्यलयात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सदर जनसंपर्क कार्यालयात छापा मारून कार्यालायची झाडाझडती घेतली पण तेथे काहीच सापडलं नाही. रावसाहेब दानवेंच्या पीआर कार्यालयाची झडती घेणारे 5 पोलीस निलंबित; मंत्र्याच्या तक्रारीनंतर कारवाई दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी याप्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त करीत दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सोमवारी उशीरा पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, युवराज पोटरे, मंगलसिंग सोळुंखे, सचिन तिडके आणि शबान तडवी या 5 पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले होते. या संपूर्ण घटनेमुळे जालना पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, राजकीय दबावाला बळी पडून निष्पाप पोलिसांना बळीचा बकरा बनविण्यात आला या शब्दात शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी नाराजी व्यक्त करत थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबईत भेट घेऊन पोलिसांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर आज त्या पोलिसांवरची निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात आली. पोलिसांवरची निलंबनाची कारवाई अन्यायकारक होती यामुळे पोलिसांचा मानसिक खच्चीकरण झालं होतं. या अन्यायाला वाचा फोडण्याचा काम मी केल्याचं खोतकरांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात