रावसाहेब दानवेंच्या पीआर कार्यालयाची झडती घेणारे 5 पोलीस निलंबित; मंत्र्याच्या तक्रारीनंतर कारवाई

Crime in Jalna: भाजप नेते (BJP Leader) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जालन्यातील जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती (Raid at PR office) घेतल्या प्रकरणी पाच दोन फोजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी निलंबित (5 policemen suspended) करण्यात आलं आहे.

Crime in Jalna: भाजप नेते (BJP Leader) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जालन्यातील जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती (Raid at PR office) घेतल्या प्रकरणी पाच दोन फोजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी निलंबित (5 policemen suspended) करण्यात आलं आहे.

  • Share this:
    जालना, 15 जून: भाजप नेते (BJP Leader) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जालन्यातील जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती (Raid at PR office) घेतल्या प्रकरणी पाच दोन फोजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी निलंबित (5 policemen suspended)  करण्यात आलं आहे. बेकायदेशीरपणे कार्यालयात घुसून झाडाझडती घेतल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल शाबान जलाल तडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्तमराव तिडके असं निलंबनाची कारवाई केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. त्यांनी कोणत्या कारणांसाठी दानवे यांच्या कार्यालयाची झडती घेतली होती, याची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी 11 जून रोजी कोणतीही पूर्व परवानगी न घेता, जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती घेतल्याचा आरोपी केंद्रीय मंत्री दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे. यावेळी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे. झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांनी कार्यालयातील कामकाजाच्या संचिका देखील सोबत घेऊन गेल्याची माहिती दानवे यांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी दानवे यांच्या तक्रारीनंतर, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणी कार्यालयीन चौकशी केली असता, संबंधित पोलीसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिली आहे. 14 जून रोजी संबंधित पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. संबंधित झडतीतून नेमकं काय निष्पन्न झालं? याचा खुलासा करावा, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published: