मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalna IT Raid : जालन्यातील 'त्या' कंपनीत नेमकं काय बनवलं जातं, जिथून जप्त झाली 390 कोटींची संपत्ती? वाचा Inside Story

Jalna IT Raid : जालन्यातील 'त्या' कंपनीत नेमकं काय बनवलं जातं, जिथून जप्त झाली 390 कोटींची संपत्ती? वाचा Inside Story

महाराष्ट्रातील जालना येथे आयकर विभागाने छापेमारी केल्याच्या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. (Jalna IT Raid) या छाप्यात 56 कोटी रुपये रोख आणि 14 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले

महाराष्ट्रातील जालना येथे आयकर विभागाने छापेमारी केल्याच्या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. (Jalna IT Raid) या छाप्यात 56 कोटी रुपये रोख आणि 14 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले

महाराष्ट्रातील जालना येथे आयकर विभागाने छापेमारी केल्याच्या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. (Jalna IT Raid) या छाप्यात 56 कोटी रुपये रोख आणि 14 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले

  जालना, 12 ऑगस्ट : महाराष्ट्रातील जालना येथे आयकर विभागाने छापेमारी केल्याच्या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. (Jalna IT Raid) या छाप्यात 56 कोटी रुपये रोख आणि 14 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. एकूण 390 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जालन्यातील दोन मोठे स्टील व्यापारी, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि कापड व्यापारी यांचे कारखाने, घरे, फार्म हाऊस आणि कार्यालयांवर आयटीने कारवाई केली आहे.

  आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्टपासून स्टील टीएमटी बारच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या दोन मोठ्या कंपन्यांच्या ठिकाणी ही शोध मोहीम येत होती. यादरम्यान जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबईतील व्यापाऱ्यांचे ३० हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्याचबरोबर ज्या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले त्यात SRJ Steel आणि Kalika Steel या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांशी संबंधित सहकारी बँक, फायनान्सर विमल राज बोरा आणि डीलर प्रदीप बोरा यांच्यावरही आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.

  हे ही वाचा : आयकर विभागाच्या धाडींमध्ये करोडोंचं घबाड जप्त होतं; पण 'या' पैशांचं पुढे काय होतं?

  फिल्मी स्टाईलमध्ये टाकलेल्या या छाप्यात ज्यांच्यावर छापा टाकला त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात करचोरी होत असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. आयकर विभागाने SRJ STEEL आणि kalika steel कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने उघडलेले लॉकर्सही शोधून काढण्यात आले. 

  सहकारी बँकेत असलेल्या या लॉकर्समधून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, एका व्यवसायिकाच्या फार्म हाऊसवर असलेल्या गुप्त खोलीतून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. या शोध मोहिमेत आतापर्यंत 56 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 14 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

  छाप्यात सापडलेली रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला 13 तास लागल्याचे सांगण्यात आले. जालन्याच्या स्टेट बँकेत ही रोकड मोजण्यात आली. काल (दि.11) गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून ही रक्कम मोजण्यास सुरू करण्यात आली होती ती दुपारी 1 वाजता बंद करण्यात आली. ही कारवाई १ ते ८ ऑगस्ट दरम्यान झाली आहे. आयकर विभागाच्या नाशिक शाखेने हा छापा टाकला. या कारवाईत राज्यभरातील 260 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. 120 हून अधिक वाहने वापरण्यात आली. या सर्व अधिकाऱ्यांची 5 टीममध्ये विभागणी करण्यात आली होती.

  हे ही वाचा : आज निवडणुका झाल्या तर निकाल काय? धक्कादायक सर्व्हे वाढवणार फडणवीस-शिंदेंचं टेन्शन

  प्रत्यक्षात जालन्यातील चार स्टील कंपन्यांच्या वर्तनात अनियमितता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती, त्यानंतर आयकर विभागाने कारवाई सुरू केली. आयकर विभागाकडून घर आणि कारखान्यावर छापे टाकले. घरात काहीही सापडले नाही, परंतु शहराबाहेरील फार्महाऊसमधील गुप्त खोलीतून रोख रक्कम जप्त करण्यात आली. आयकर विभागाने स्टील व्यापाऱ्यांची घरे, कार्यालये, विविध ठिकाणच्या जमिनी, शेततळे, बंगले, बँकेतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. यामध्ये सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता मिळाल्याचा दावा आयकर विभागाकडून आहे.

  छापे टाकताना, व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांना याची माहिती मिळू नये आणि छाप्याच्या तयारीची बातमी पसरू नये म्हणून पथकांनी पूर्ण दक्षता घेतली. त्यासाठी नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई येथील अधिकारी आपल्या वाहनांवर वधू-वरांच्या नावाचे स्टिकर्स लावून ते लग्नाला जात असल्याचे दाखवण्यासाठी प्रत्येक वाहनावरील स्टिकरवर 'दुल्हन हम ले जायेंगे' हा छाप्याचा कोड वर्ड लिहिला होता.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Crime news, Income tax, Raid

  पुढील बातम्या