मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आयकर विभागाच्या धाडींमध्ये करोडोंचं घबाड जप्त होतं; पण 'या' पैशांचं पुढे काय होतं?

आयकर विभागाच्या धाडींमध्ये करोडोंचं घबाड जप्त होतं; पण 'या' पैशांचं पुढे काय होतं?

आयकर नियमांनुसार, ज्या पैशांची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जात नाही, मोठ्या प्रमाणात कर भरावा लागतो. यामध्ये 60 टक्के कर, 25 टक्के अधिभार आणि 6 टक्के दंडाचा समावेश आहे.

    मुंबई, 12 ऑगस्ट : जालन्यामध्ये आयकर विभागाने छापा टाकून तब्बल 390 कोटींच्या बेनामी संपत्तीचा पर्दाफाश केला आहे. कमालीची गुप्तता पाळून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही धाड टाकली. विशेष म्हणजे, राहुल आणि अंजलीच्या लग्नाला आल्याचे भासवून या आयकर विभागाने ही मोहीम फत्ते केली. पण, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये काहीच हाती लागले नाही. पण, जेव्हा फॉर्महाऊसवर छापा टाकला तेव्हा नोटांची बंडल सापडली. जालन्यातील मोठे स्टील व्यापारी, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि कापड व्यापारी यांचे कारखाने, घरे, फार्म हाऊस आणि कार्यालयांवर आयटीने कारवाई केली. पण अनेकांना प्रश्न पडला असेल एवढी मोठी रक्कम आयकर विभागाकडे गेल्यावर त्याचं पुढे काय होतं. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आयकर नियमांनुसार, करदात्याच्या खात्यात येणाऱ्या पैशांवर निश्चितपणे कर आकारला जातो. जर करदात्याने अशा कोणत्याही पैशावर कर भरला नसेल, तर त्याने त्या पैशाचा स्रोत आणि त्या पैशावर कर का भरला नाही हे देखील सांगावे लागेल. उत्पन्नाचे स्रोत जाणून घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा अशा पैशामुळे तुमच्यावर कराचा मोठा बोजा पडू शकतो. Jalana raid : राहुल-अंजलीच्या लग्नाला आले अन् बेडखालून काढली पैशांची बंडलं, सोन्याच्या विटा अन् हिरे! आयकर कायद्याच्या कलम 69A अन्वये, जर एखाद्या व्यक्तीकडे पैसे, सोने, दागिने किंवा इतर कोणतीही मौल्यवान वस्तू आढळली ज्याचा खात्यात उल्लेख नाही आणि करदात्याने त्याच्या स्त्रोताबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, किंवा जर  अधिकारी दिलेल्या माहितीवर समाधानी नसेल, तर ते त्या व्यक्तीचे त्या वर्षाचे उत्पन्न मानले जाईल. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मोठा कर आकारला जातो आयकर नियमांनुसार, ज्या पैशांची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जात नाही, मोठ्या प्रमाणात कर भरावा लागतो. यामध्ये 60 टक्के कर, 25 टक्के अधिभार आणि 6 टक्के दंडाचा समावेश आहे. म्हणजेच अशा पैशावर कर घेताना तो कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये पडतो हे पाहिले जात नाही, तर त्यावर 60 टक्के कर थेट आकारला जातो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Income tax, Money

    पुढील बातम्या