मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalna Crime : महागाईमुळे चोरांनी चोरीचे प्रकार बदलले पैशासोबत लाखो रुपयांचा किराणाच चोरला

Jalna Crime : महागाईमुळे चोरांनी चोरीचे प्रकार बदलले पैशासोबत लाखो रुपयांचा किराणाच चोरला

अज्ञात चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूने दुकानाची भिंत फोडून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोख 23 हजार रुपयांसह तब्बल पाच लाख रुपयांचा किराणा माल चोरून नेला.

अज्ञात चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूने दुकानाची भिंत फोडून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोख 23 हजार रुपयांसह तब्बल पाच लाख रुपयांचा किराणा माल चोरून नेला.

अज्ञात चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूने दुकानाची भिंत फोडून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोख 23 हजार रुपयांसह तब्बल पाच लाख रुपयांचा किराणा माल चोरून नेला.

  • Published by:  Sandeep Shirguppe

जालना, 19 जुलै : वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे आधीच कंबरडे मोडले असून आता किराणा मालावर देखील GST लावल्याने त्यात आता अजूनच भर पडलीय. या वाढत्या महागाईमुळेच की काय चोरट्यांनी आता आपला मोर्चा थेट किराणा दुकानाकडे वळविला. परतूरमधील एक किराणा दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल 5 लाखांचा किराणा माल लंपास केला आहे. परतूर शहरातील मोंढा परिसरात गणेश राजबिंडे यांची विजय प्रोव्हिजन्स नावाने किराणा दुकान आहे. रविवारी राजबिंडे नेहमीप्रमाणे रात्री आपली दुकान बंद करून घराकडे गेले होते. (jalana crime)

दरम्यान, रात्री अज्ञात चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूने दुकानाची भिंत फोडून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोख 23 हजार रुपयांसह तब्बल पाच लाख रुपयांचा किराणा माल चोरून नेला. ज्यामध्ये 18 हजार रुपये किमतीची 5 क्विंटल साखर, 13500 रुपये किमतीचा दोन क्विंटल साबुदाणा, 24600 रुपये किमतीची 70 किलो चहा पत्ती, 19हजार रुपये किमतीची 2 क्विंटल शेंगदाणा,  35 हजार रुपये किमतीची डाळ, 23 हजाराची मिरची, 47 हजाराचा गोड तेल यासह साबण, सोप सुपारी, खोबर, रवा, मैदा, गुलाब जमून मिक्स, तूप, तांदूळ,पोहे, अगरबत्ती, मसाले आणि ड्राय फ्रुटचा समावेश आहे. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या किराणा चोरांचा शोध घेतायत.

हे ही वाचा : दिल्लीत शिंदे गटाकडून झाली चूक, लोकसभा सचिवालयाने पत्र परत पाठवले, खासदारांचे बंड झाले फेल?

जालना जिल्ह्यात एकाच दिवशी दोन चोरीच्या घटना

पुणे (Pune) शहरातून महागड्या केटीएम दुचाकी आणि मोबाईल चोरी करून जालना शहरात विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच महागड्या दुचाकी चार मोबाईलसह मोठ्या शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला जालना शहरात दोन युवक पुणे शहरातून चोरी केलेल्या महागड्या केटीएम दुचाकी व मोबाईल विक्रीसाठी घेऊन येत ग्राहकांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हे ही वाचा : आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतंय, कदमांनी मंत्रालयातील गोष्टी केल्या उघड!

त्यानंतर पोलिसांनी नूतन वसाहत परिसरात राहणाऱ्या संदेश पाटोळे या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आणि त्याचा मित्र सुरज कसबे याने पुणे शहरातून चार केटीएम दुचाकी आणि मोबाईल चोरी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

First published:

Tags: Crime, Crime news, Financial crime

पुढील बातम्या