जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / jalgaon News : ट्रेनवर चढला अन् बसला भयानक करंट, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

jalgaon News : ट्रेनवर चढला अन् बसला भयानक करंट, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

जळगावातील धक्कादायक घटना

जळगावातील धक्कादायक घटना

jalgaon News : जळगाव रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर एका माथेफिरु अनोळखी इसमाने थांबलेल्या रेल्वे मालवाहू रेल्वे गाडीवर उभे राहून विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाला.

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदुरकर प्रतिनिधी जळगाव : रेल्वेच्या विद्यूत वाहिनीजवळ जाऊ नका हे सांगूनही माथेफिरुनं ऐकलं नाही. माथेफिरुन मालगाडीवर चढत असताना त्याला विद्यूत शॉक लागला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जळगाव रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर एका माथेफिरु अनोळखी इसमाने थांबलेल्या रेल्वे मालवाहू रेल्वे गाडीवर उभे राहून विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत
जाहिरात

मालवाहू रेल्वेच्या डब्यावर हा व्यक्ती चढत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. डब्यावर उभा राहिल्याने एका अनोळखी व्यक्तीचा रेल्वेच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतिफ शहा यांनी तपासणी यांची मयत घोषित केले.

BJP : गटारीनिमित्त भाजपच्या वतीनं कोंबडी वाटप; ‘या’ ठिकाणी मिळणार मोफत कोंबडी

रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून नजीकच्या जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात