जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / '...तर आम्ही पुन्हा येऊ,' 23 लाखांचा ऐवज नेत घरातून जाताना दरोडेखोरांनी दिली धमकी

'...तर आम्ही पुन्हा येऊ,' 23 लाखांचा ऐवज नेत घरातून जाताना दरोडेखोरांनी दिली धमकी

'...तर आम्ही पुन्हा येऊ,' 23 लाखांचा ऐवज नेत घरातून जाताना दरोडेखोरांनी दिली धमकी

चाकूच्या धाकावर 3 लाख रुपये रोख आणि 20 लाखांचे दागिने असा एकूण 23 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 3 फेब्रुवारी : जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात दौलतनगर येथे एका घरावर दरोडा टाकण्यात आला आहे. सहा जणांनी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घरात घुसून चाकूच्या धाकावर 3 लाख रुपये रोख आणि 20 लाखांचे दागिने असा एकूण 23 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल खाली गेटजवळ ठेवून पोबारा केला. दौलतनगर येथे पिंटू बंडू इटकरे हे पत्नी मनीषा व तीन वर्षांची मुलगी हरीप्रिया यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. इटकरे यांचा लोखंडी रॉड आसार्‍यांचा होलसेलचा व्यवसाय असून ट्रेडिंग कंपनी आहे. पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास तोंडाला मास्कसह रुमाल बांधलेले तसेच हातात धारदार शस्त्र असलेले सहा जण लाकडी दरवाजा कटरने कापुन आतील कडी उघडून इटकरे यांच्या दुमजली घरात घुसले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकत दागिने तसेच तीन लाखांची रोकड व दागिने काढून घेतले. हेही वाचा - नवऱ्याबरोबच्या भांडणात जीवाचाही विचार केला नाही, 8 महिन्याच्या चिमुरडीसह दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी परत जाताना दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल तसेच घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर बॉक्सही काढून नेला. तसेच पोलिसांना प्रकार कळवला तर आम्ही पुन्हा येऊ तसंच तुम्हाला ठार करू अशी धमकी दिली. भयभीत झालेल्या दाम्पत्याने नातेवाईकांना प्रकार कळवला. तसंच सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेल्या प्रकाराची हकीकत पोलिसांना सांगितली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात