जळगाव, 18 सप्टेंबर : जळगाव जामोद परिसरात मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. यावरून एका तृतीय पंथीला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Jalgaon Crime) दरम्यान त्या तृतीय पंथीला मारहाण करत असताना बाकीच्या लोकांनी बघ्याची भुमीका निभावल्याने नेमका गुन्हा कोणी केला यावर तर्क वितर्क लढवला जात आहे. ही घटना 14 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद येथे घडली.
सविस्तर माहिती असे की, मलकापूर येथील रहिवाशी सायरा मोगरा जान (वय 20) भिक्षा मागण्याचे काम करून गावोगावी जाऊन दुकानावर व बाजारात दक्षिणा मागत असते. दरम्यान 14 सप्टेंबर रोजी सायरा मोगरा जान व रेणुका जान हे दक्षिणा मागण्यासाठी जळगाव जामोदला आल्या त्यानंतर जामोदचा बाजार असल्याने तेथून भिक्षा घेऊन एका रिक्षामध्ये बसून जुने बसस्टँडवर दुपारी 4 च्या सुमारास पोहोचले.
हे ही वाचा : VIDEO : हॉस्टेलमधील 60 तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS व्हायरल, 8 जणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न; विद्यापीठात मोठा गोंधळ
त्यानंतर ऑटो चालकाने काही लोकाना फोन करून माझ्या ऑटोमध्ये मुले चोरून नेणारी बाई आहे असे सांगितले. त्यानंतर तिथे 7 ते 8 अनोळखी माणसे आली व त्यापैकी 4 ते 5 जणांनी सायरा यांना रिक्षातून ओढून लाथा, बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर सायराला जळगाव जामोद पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. यावेळी ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी मलकापूर येथे चौकशी करून सायरा मोगरा जान ही आश्रमात राहत असून सायरा ही मुले पळवून नेणारी नसून दक्षिणा मागणारी आहे याची खात्री केली.
दरम्यान सायराला मारहाण करणारे गाजी खान उर्फ बाबर आमिर खान, नवसिंग दुर्गा सिंग सोळंके, प्रवीण उर्फ भुरा भीमराव तायडे, दीपक सुखदेव उंबरकर, अभिजीत विलास तापडे यांच्यावर 323, 143, 147, 149 नुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला.
हे ही वाचा : Kolhapur Crime : धक्कादायक! कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, रुग्णालयात गेल्यानंतर भयानक वास्तव समोर
पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय घोडेस्वार करीत आहेत. तसेच पोलीस प्रशासन दक्ष असून कोणीही अफवांना बळी पडू नये असे ठाणेदार आंबुलकर यांनी सांगितले आहे.