जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Irshalwadi : इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्यांचे नाथ होणार मुख्यमंत्री शिंदे, घेतला मोठा निर्णय

Irshalwadi : इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्यांचे नाथ होणार मुख्यमंत्री शिंदे, घेतला मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत

Irshalwadi : समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अजित मांढरे, मुंबई, 22 जुलै : इर्शालवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप अनेकजण बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य सुरूच आहे. दरम्यान, या दुर्घटनेत बचावलेल्या काही मुलांनी त्यांचे आई-वडील गमावले आहेत. अशा अनाथ मुलांचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं आहे. सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याचा निर्णय डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने घेतला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवरून दिलीय. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत. शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट, रायगडमधील आणखी 103 गावं धोकादायक दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी देखील 2020 साली महाड येथील तारीक गार्डन या दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावलेल्या दोन लहान बालकांचे संपूर्णता पालकत्व स्वीकारले होते. तसेच 2021 साली पालघर येथे रोजगाराअभावी आत्महत्या केलेल्या कामगार दाम्पत्यांच्या 2 मुलांचे पालकत्वही श्री शिंदे यांनी स्वीकारले असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: raigad
  • First Published :
जाहिरात
जाहिरात