इंदुरीकर महाराज, हाजीर हो! आज कोर्टात महत्त्वाची सुनावणी

इंदुरीकर महाराज, हाजीर हो! आज कोर्टात महत्त्वाची सुनावणी

संगमनेर कोर्टाने इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावले असून आज कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे.

  • Share this:

संगमनेर, 07 ऑगस्ट : लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे. संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला  आहे. आता इंदोरीकर महाराज आज कोर्टात हजर राहणार का? आणि आपली काय बाजू मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

'अमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते' असं वक्तव्य असलेला इंदुरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी हे वक्तव्य कुठे आणी कधी केले याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र  पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर 26 जुन रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्या प्रकरणी संगमनेर कोर्टाने इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावले असून आज कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे.

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले ?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.'

पीसीपीएनडीटी च्या सल्लागार समितीने प्रसारित व्हिडीओ, वृत्तपत्रातील बातम्या यावर आता हभप इंदुरीकर महाराजांना नोटीस पासून खुलासा मागवला आहे. यामुळे आपल्या कीर्तनातून प्रबोधनासोबतच हास्यफुलवणाऱ्या महाराजांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर उमटली असणार आहे. आता इंदोरीकर महाराज या गोष्टीला कसा प्रतिवाद करणार की एखाद्या कीर्तनातून आपल्या मिश्किल शैलीत समाचार घेणार ये येणाऱ्या काळात पुढे येणार आहे.

Published by: sachin Salve
First published: August 7, 2020, 7:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading