Home /News /maharashtra /

सम-विषम नाही तर दुसऱ्याच प्रकरणात इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी

सम-विषम नाही तर दुसऱ्याच प्रकरणात इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी

अनेक ठिकाणी चर्मकार संघटनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदने दिली जात आहेत.

अहमदनगर, 6 मार्च : गेल्या काही दिवसांपासून इंदोरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी केलेल्या सम-विषम तिथीच्या वक्तव्याचा वाद शमत नाही, तोच चर्मकार समाजाबद्दल आक्षपार्ह वक्तव्य इंदोरीकरांनी केल्याचा आरोप होत आहे. अनेक ठिकाणी चर्मकार संघटनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदने दिली जात आहेत. चौफेर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता इंदोरीकरांनीच एक पाऊल मागे येत समाजाची दिलगीरी व्यक्त केली आहे. 'मी सर्व धर्म समभाव मानणारा असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. किर्तानासाठी अबाल वृद्ध सर्वच जाती धर्माचे लोक येतात कधीतरी एखाद वाक्य अनावधानने गेलं असेल तर त्याबद्दल दिलगीर आहे,' असं इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. आज सकाळी नाशिक जिल्ह्यातील सायगाव येथे झालेल्या किर्तनात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. इंदोरीकर महाराजांचा पाय आणखी खोलात, अडचणी वाढण्याची शक्यता वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. कारण सम-विषम तिथीवरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हेही वाचा-जातीयवादाचं विष पसरवण्यासाठी काही लोक कार्यरत, विक्रम गोखले यांचा गंभीर आरोप इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकडे सोपवला आहे. हा व्हिडिओ तपासून आता इंदोरीकर महाराज यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे खरंच इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Indurikar maharaj, Indurikar maharaj video

पुढील बातम्या