जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Indias First Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन शिर्डीत दाखल, 830 प्रवाशांसह कोईम्बतूरमधून साईनगरीत

Indias First Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन शिर्डीत दाखल, 830 प्रवाशांसह कोईम्बतूरमधून साईनगरीत

Indias First Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन शिर्डीत दाखल, 830 प्रवाशांसह कोईम्बतूरमधून साईनगरीत

Indias first private train reached shirdi with 830 passengers from coimbatore: भारतातील पहिली खासगी ट्रेन अखेर शिर्डीत दाखल झाली आहे. आपल्या निर्धारित वेळेच्या एक तास आधीच ही रेल्वे शिर्डीत पोहोचली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सुनिल दवंगे, प्रतिनिधी शिर्डी : भारत गौरव योजने **(Bharat Gaurav Scheme)**अंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे (India’s first private train) सकाळी निर्धारित वेळेच्या एक तास आधी शिर्डी साईनगर (Sai Nagar Shirdi) रेल्वे स्टेशनवर पोहचली. मंगळवारी कोईम्बतूर येथून या साऊथ स्टार रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता ही रेल्वे 830 प्रवासी घेवून शिर्डीत दाखल झाली आहे. या रेल्वेने आलेल्या प्रवाशांचे यावेळी स्वागत करण्यात आले. वेळेआधीच पोहचल्याचे समाधान आणि पहिल्या खाजगी रेल्वेत बसण्याच्या आनंद साईभक्त प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसून आला. भारत गौरव साऊथ स्टार ही रेल्वे कोईम्बतूरहून मंगळवारी निघाली होती. तिरुपूर, इरोड, सेलम जोलारपेट, बेंगळुरू येलाहंका, धर्मावरा, मंत्रालयम रोड आणि वाडी असे थांबे पार करुन तिला सकाळी 7:30 वाजता साईनगर रेल्वे स्थानकावर पोहचणे निर्धारित केले होते. मात्र ही फुलांनी सजवलेली रेल्वे सकाळी वेळेच्या आधीच एक तास साईनगर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पोहचली. यातून 830 प्रवासी शिर्डीत दाखल झाले आहेत. प्राईव्हेट रेल्वेच्या चालकाचा आणि आलेल्या भाविकांचा यावेळी सन्मान करत स्वागत करण्यात आले.

News18

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला 2 वर्षांसाठी लीजवर दिली आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरने कोचच्या जागांचे नूतनीकरण केले आहे. महिन्याला किमान तीन ट्रीप केल्या जातील. यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण 20 डबे आहेत. ट्रेनचे भाडे भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणार्‍या नियमित रेल्वे तिकीट दरांच्या बरोबरीचे आहे.

News18

शिर्डी साईबाबा मंदिरात विशेष दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. ट्रेनची देखभाल हाऊसकीपिंग सर्विस प्रोवाइडर्सद्वारे केली जाईल, जे संपूर्ण प्रवासादरम्यान काही काही वेळाने साफसफाई करतात. तसेच ट्रेनमध्ये शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.रेल्वे पोलीस दलासह रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर, खासगी सुरक्षा कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. वाचा : भारतातील पहिली खाजगी ट्रेन; काय आहेत याची वैशिष्ट्ये? एम ॲंन्ड सी कंपनीचे कमेटी मेंबर प्रसाद आय्यर यांनी यावेळी सांगातले की, भारत गौरव योजने अंतर्गत साऊथ स्टार एक्सप्रेस अशी ही रेल्वे असून मंगळवारी कोईम्बतूर येथून निघाली होती. मंत्रालयम येथे पाच तासांचा होल्ड देण्यात आला होता. तरी देखील वेळेच्या आधीच रेल्वे शिर्डीत पोहचली आहे. एम ॲंड सी या कंपनीने ही रेल्वे लीज वर घेतली असून या कंपनीचे जेम्स चार्लिज मार्टिन हे एमडी आहेत. रेल्वे संभाळण्यासाठी संपुर्ण संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. आज ही रेल्वे याठिकाणी मुक्काम करणार आहे. उद्या सात वाजता साईसंस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ही रेल्वे पुन्हा परतीचा प्रवासाकडे प्रस्थान करेन.

News18

या स्पेशल ट्रेनमध्ये 1500 लोक प्रवास करू शकतात. दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ या ट्रेनमधील स्लीपरना नॉन एसीसाठी 2500 रुपये, थर्ड एसीसाठी 5000 रुपये, सेकंड एसीसाठी 7000 रुपये आणि फर्स्ट एसीसाठी 10,000 रुपये मोजावे लागत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shirdi , train
  • First Published :
जाहिरात
जाहिरात