मुंबई, 16 फेब्रुवारी : भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत कारवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वी शॉने सेल्फी काढायला नकार दिल्याने आठ जणांच्या जमावाने त्याच्या कारवर बेसबॉल स्टीकने हल्ला केला. मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.
पृथ्वी शॉ आपल्या मित्राच्या कारमध्ये बसला होता. त्यावेळी तिथे काही जण पृथ्वी शॉ सोबत सेल्फी घेण्यासाठी आले. पण पृथ्वी शॉने नकार देताच त्यांनी रागाच्या भरात पृथ्वी शॉ बसलेल्या कारवर हल्ला केला. या प्रकरणी पृथ्वी शॉने ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा : ‘फिटनेस सिद्ध करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू इंजेक्शन घेतात’ - चेतन शर्मांचा धक्कादायक खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार सना गिल आणि शोभित ठाकूर या दोघांसह अन्य व्यक्तीनी कारवर हल्ला केला. ही घटना 15 फेब्रुवारीच्या रात्री मुंबईतील विलेपार्ले परिसरात घडली. पृथ्वी शॉने सेल्फी घेण्यास नकार दिल्यानंतर हा वाद झाला.
या प्रकरणी पोलिसांनी सना गिल, शोभित ठाकूर यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वी आणि त्याचा मित्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. यादरम्यान पृथ्वी शॉचा चाहता आणि एक मुलगी त्याच्या टेबल आले आणि फोटो घेऊ लागले.
काही फोटो घेतल्यानंतर चाहत्याने सतत व्हिडिओ आणि फोटो घेऊ लागला. त्यानंतर पृथ्वी शॉने त्याचा मित्र आणि हॉटेल मालकाला फोन करून फॅन्सना हटवण्यास सांगितले. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने त्या दोघांना बाहेर हाकलले. दरम्यान त्या दोघांसह काहीजण पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र रेस्टॉरंटमधून निघण्याची वाट पाहत राहिले होते.
दरम्यान शॉ आणि त्याचा मित्र बाहेर आल्यानंतर गाडीतून काही अंतरावर जाताना आरोपींनी कारला घेराव घातला. दरम्यान आरोपींन पृथ्वी शॉच्या मित्राच्या वाहनावर हल्ला करत काच फोडून मारामारी करू लागला. एवढेच नाही तर त्याने पृथ्वीच्या मित्राकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. यादरम्यान पृथ्वी शॉला ताबडतोब दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आले.
हे ही वाचा : विराटचा स्वॅगच निराळा! चेतन शर्मानी केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर कोहलीची पहिली पोस्ट
याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. ओशिवरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 143, 148, 149, 384, 437, 504, 506 अन्वये पोलिसांनी सना गिल आणि शोभित ठाकूर यांच्यासह एकूण 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरोपींचा शोध सुरू आहे.