जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आता बोला! पोलीस अधिकाऱ्याने शिपायाला बसवलं पेपर द्यायला, अखेर अशी झाली पोलखोल

आता बोला! पोलीस अधिकाऱ्याने शिपायाला बसवलं पेपर द्यायला, अखेर अशी झाली पोलखोल

परीक्षेत काही पेपरला सुधीर खिरडकर यांनी प्रत्यक्षात न बसता त्यांच्या जागेवर पोलीस शिपाई सोमनाथ मंडलिक यास डमी विद्यार्थी म्हणून बसविले होते.

परीक्षेत काही पेपरला सुधीर खिरडकर यांनी प्रत्यक्षात न बसता त्यांच्या जागेवर पोलीस शिपाई सोमनाथ मंडलिक यास डमी विद्यार्थी म्हणून बसविले होते.

परीक्षेत काही पेपरला सुधीर खिरडकर यांनी प्रत्यक्षात न बसता त्यांच्या जागेवर पोलीस शिपाई सोमनाथ मंडलिक यास डमी विद्यार्थी म्हणून बसविले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

जालना, 09 जून : जालना (jalana) जिल्ह्यातील एका विधी महाविद्यालयात एलएलबीच्या प्रथम वर्षाला शिकताना तत्कालीन पोलीस उपाधीक्षक आणि सद्या लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात उपप्राचार्य असलेले सुधीर खिरडकर (Sudhir Khiradkar) यांनी आपल्या जागी दुसरा विद्यार्थी परीक्षेला बसून मुन्नाभाई एमबीबीएस बनण्याच्या प्रयत्न केल्याचे चौकशी समितीच्या अहवालावरून स्पष्ट झालंय. खिरडकर यांनी जालन्यात उपविभागीय पोलीस अधिकारी असताना LLB ला प्रवेश घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विधी प्रथम वर्षाची परीक्षा ऑक्टोबर- नोव्हेंबर 2019 मध्ये जालना येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात घेतली होती.  या परीक्षेत काही पेपरला सुधीर खिरडकर यांनी प्रत्यक्षात न बसता त्यांच्या जागेवर पोलीस शिपाई सोमनाथ मंडलिक यास डमी विद्यार्थी म्हणून बसविले होते. यासंदर्भात विद्यापीठाकडे  तक्रार करण्यात आली होती. या तक्रारींच्या अनुषंगाने विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती गठन केली होती. ( मोठी बातमी! कॅन्सरवर 100 टक्के परिणामकारक ठरणारं औषध सापडलं? ) या समितीने 9 मे 2022 रोजी आपला चौकशी अहवाल विद्यापीठास सादर केला असून, सुधीर खिरडकर आणि डमी विद्यार्थी सोमनाथ मंडलिक या दोघांना दोषी ठरविले आहे. या अहवालाचे अनुषंगाने विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ( ट्रॅव्हल्स बस आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक, 3 जण जागीच ठार ) दरम्यान, खिरडकर हे जालन्यात उपविभागीय पोलीस अधिकारीपदी कार्यरत असताना लाच प्रकरणात निलंबित होते.  एका समाजाविषयक वादग्रस्त वक्तव्य करत भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर देखील खिरडकर चांगलेच वादाच्या भोऱ्यात सापडले होते. सध्या ते लातूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. लाचेचा आरोप असलेले आणि कायद्याच्या परीक्षेत आपल्या जागी दुसरा डमी उमेदवार बसविणारे कायद्याचे रक्षक रुपी भक्षक अधिकाऱ्यावर कधी कारवाई होणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात