• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'लाईन मारण्याचे दिवस आता संपले' म्हणत उदयनराजेंनी मारला डोळा VIDEO

'लाईन मारण्याचे दिवस आता संपले' म्हणत उदयनराजेंनी मारला डोळा VIDEO

'निवांत कधी असावं, ज्यावेळेस सातारा प्रगतशील होईल. संध्याकाळी मित्रांनी एकमेकांना फोन केला की, सगळ्यांचे कोडवर्ड ठरलेले असतात'

'निवांत कधी असावं, ज्यावेळेस सातारा प्रगतशील होईल. संध्याकाळी मित्रांनी एकमेकांना फोन केला की, सगळ्यांचे कोडवर्ड ठरलेले असतात'

'निवांत कधी असावं, ज्यावेळेस सातारा प्रगतशील होईल. संध्याकाळी मित्रांनी एकमेकांना फोन केला की, सगळ्यांचे कोडवर्ड ठरलेले असतात'

  • Share this:
सातारा, 16 ऑक्टोबर : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे भाजपचे खासदार उदनयराजे भोसले (udayanraje bhosle) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosle) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आज पुन्हा एकदा उदयनराजे यांनी तरुणांशी संवाद साधत असताना जोरदार फटकेबाजी केली. यावेळी उदयनराजेंनी चक्क डोळा मारत तरुणाला कामाला लागण्याचा आपल्या स्टाईलने सल्ला दिला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आज  उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील युवकांशी संवाद साधला. 'यावेळी साताराच्या विकासाच्या दृष्टीने युवकांनी मला साथ द्यावी मी कायम विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी केली. 'आपण पण नेमकं काय करायचे हे ठरवायला आज आपण इथं जमलो आहे. मला माहित आहे करूया, झालं, पाहिजे होईल. काम करणारे दुसर्‍यावर अवलंबून राहत नसतात. सातारा एवढा हॅपनिंग करून टाकतो की पुण्या-मुंबईचे लोक साताऱ्यात आले पाहिजेत. फक्त तुमची साथ पाहिजे. उदयनराजे म्हणजे तोंडाच्या वाफा नाहीत, बोला तो बोला, असा म्हणताच सभागृहात एकच टाळ्या आणि शिट्यांचा पाऊस पडला. 'हाफ चड्डी बदलली, डोळे मारण्याचे दिवस गेले, लाईन मारण्याचे दिवस आता संपले आहे, आता तरी कामाला लागायचं की नाही, असं म्हणत उदनयराजेंनी चक्क डोळा मारून दाखवला. तसंच, 'सातारा जिल्ह्याचे वैशिष्ट्य माहित आहे का? कोणालाही विचारा कसा आहेस? विचारलं तर उत्तर येते निवांत...निवांत कधी असावं, ज्यावेळेस सातारा प्रगतशील होईल. संध्याकाळी मित्रांनी एकमेकांना फोन केला की, सगळ्यांचे कोडवर्ड ठरलेले असतात. असं म्हणत उदयनराजेंनी कॉलर उडवत 'लिव्ह लाइफ इज किंग स्टाइल' असा डॉयलॉग हाणला. Bigg Boss फेम या अभिनेत्रीला गंभीर दुखापत, चालणंही झालंय कठीण 'ग्रेड सेपरेटर बनवताना खोदून ठेवलेल्या कामाबाबत आमदार शिवेंद्रराजे यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले, खोदून ठेवल्याशिवाय कामे कशी होणार. कामाला उशीर का लागला यावर टीका होते. प्रत्येक गोष्टीला प्रपोजल तयार करावे लागते. पाठ पुरावा करावा लागतो आणि मग ही विकास कामे होत असतात. जन्माला येणाऱ्या बाळाला देखील नऊ महिने लागतात. मी काही देव नाही' असा टोलाही उदयनराजेंनी लगावला. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू हा लोकांनी खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे, असे सांगून 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मै अपनी खुद की भी नही सुनता' अशी डायलॉगबाजीही उदयनराजेंनी केली.
Published by:sachin Salve
First published: