Home /News /maharashtra /

VIDEO: हळदी समारंभामधील नाच-गाणं भोवलं; कल्याणमध्ये नवरदेवावर लग्नापूर्वीच गुन्हा दाखल

VIDEO: हळदी समारंभामधील नाच-गाणं भोवलं; कल्याणमध्ये नवरदेवावर लग्नापूर्वीच गुन्हा दाखल

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात हळदी समारंभामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन (Violation of Corona Rules) केल्याप्रकरणी नवरदेव आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कल्याण, 18 एप्रिल: राज्यात कोरोनाची स्थिती (Maharashtra corona) अतिशय विदारक आहे. रोज कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद होत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही अनेकजण याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. कल्याणच्या (Kalyan) विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात हळदी समारंभामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन (Violation of Corona Rules) केल्याप्रकरणी नवरदेव आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. कार्यक्रमात लोकांनी मास्क घातले नव्हते. विशेष म्हणजे येथे बैलांना सोबत घेऊन नाच-गाणे करण्यात येत होते, बैलांवर पैसेही उधळण्यात येत होते. कोणीही सुरक्षित अंतर ठेवल्याचे दिसत नव्हते. परिसरात या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, कोरोनाचे नियम मोडून असे कार्यक्रम करणे संबंधितांना चांगलेच महागात पडले आहे. लग्नापूर्वीच नवरदेवावर गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदी असताना आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयपीसी कलम 188 , आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 आणि साथ रोग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 नुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे विठ्ठवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी के. पी थोरात यांनी माध्यमांना सांगितले. हे वाचा - रामायणमधील सीता सरकारवर नाराज; लॉकडाउनमुळं घरातच साजरा करावा लागतोय वाढदिवस दरम्यान, राज्यातील कोरोना स्थिती गंभीर असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 67 हजार 123 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनावरदेखील प्रचंड ताण असताना काही लोक याकडे गांभीर्याने पाहत नसून कोरोना नियमांचे उल्लघंन करत आहेत. त्यामुळे कोरोना परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी बळावण्याची शक्यता जास्त आहे. हे वाचा - Corona : मुंबईमध्ये बेड शोधण्यासाठी धावपळ करताय? आता केवळ एका क्लिकवर घरबसल्या मिळवा संपूर्ण माहिती
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Crime, Kalyan, Police complaint, Rules violation

    पुढील बातम्या