मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सांगलीमध्ये Omaicron चा शिरकाव, राज्यात रुग्णांची संख्या 500 पार

सांगलीमध्ये Omaicron चा शिरकाव, राज्यात रुग्णांची संख्या 500 पार

सांगली शहरातल्या दोघांना ओमायक्रॉन लागण झाल्याची पहिलीच घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सांगली शहरातल्या दोघांना ओमायक्रॉन लागण झाल्याची पहिलीच घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सांगली शहरातल्या दोघांना ओमायक्रॉन लागण झाल्याची पहिलीच घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सांगली, 02 जानेवारी : कोरोनाचा  (corona) नवी व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई, पुणे वगळता आता छोट्या शहरांमध्ये सुद्धा ओमायक्रॉनचा संसर्ग पसरत चालला आहे. पुण्यापाठोपाठ  सांगलीमध्ये सुद्दा ओमायक्रॉन (Omaicron )दाखल झाला आहे. सांगली (sangali) शहरातील एका पती-पत्नी ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. खाजगी लॅब मध्ये पती-पतीचे रिपोर्ट ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले. राज्य शासनाकडे हा अहवाल दिला होता,त्यानंतर तो जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर सांगली शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना,ओमायक्रॉन संकट सांगलीवर आता येऊन ठेपले आहे. शहरातील एका पती-पत्नीला ओमायक्रॉन लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  25 डिसेंम्बर ला या पती-पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या पती-पत्नीने खासगी लॅबमध्ये ओमायक्रॉनची टेस्ट देखील केली होती. याचा अहवाल खाजगी लॅबकडून राज्य शासनाला प्राप्त झाला होता. ज्यामध्ये सांगलीतल्या दोघा जणांना ओमायक्रोन लागण झाल्याचं समोर आले. त्याची माहिती राज्य शासनाकडून तातडीने जिल्हा प्रशासनाला सायंकाळच्या सुमारास कळवण्यात आली.

(सरकारी कर्मचाऱ्यांवर मुख्यमंत्री मेहरबान, पदरात सलग चार दिवसांची सुट्टी)

त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागी झाले आहे.तर सद्य स्थितीत दोघा पती-पत्नी यांची प्रकृती ठीक असून दोघांवर घरामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, पालिका प्रशासनाकडून महापालिका क्षेत्रातील दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आलेली आहे.

(नवीन-नवीनच लग्न झालं असेल तर चुकूनही या 5 गोष्टी खाऊ नका; पश्चातापाची वेळ येईल)

तसंच या पती-पत्नींचा प्रवासाची हिस्ट्री देखील तपासण्यात येत आहे. मात्र सांगली शहरातल्या दोघांना ओमायक्रॉन लागण झाल्याची पहिलीच घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 510 वर

दरम्यान, आज राज्यात पुन्हा एकदा 50 रुग्ण आढळून आले आहे. या 50 रुग्णांपैकी 36 रुग्ण फक्त पुण्यात ( pune omaicron Patients) आढळले आहे. राज्य आरोग्य विभागाने कोरोनाच्या परिस्थितीची माहिती प्रसिद्ध केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आज राज्यात नवे 50 ओमायक्रॅान रूग्णांचे निदान झाले आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत आज सर्वाधिक 36 रुग्ण आढळले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीण 02, सांगली 02, ठाणे आणि मुंबईमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर राज्यात ओमायक्रॉन रूग्णांचा आकडा आता 510 वर पोहोचला आहे.

First published: