हिंगोली 09 सप्टेंबर : आज जग विज्ञानाच्या मदतीने दिवसेंदिवस प्रगती करत खूप पुढे चाललं आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी अशा काही घटना घडतात, ज्या सर्वांनाच थक्क करून सोडतात. अशीच एक घटना आता हिंगोलीतून समोर आली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी तांडा या गावात अंधश्रद्धेची हद्दच पार झाली आहे. या गावात एका सहा महिन्याच्या बालिकेच्या रूपाने देवीने अवतार घेतल्याची अफवा पसरली आहे.
विमानात घडलं भयंकर! ...अन् प्रवाशांनी स्वतःलाच टॉयलेटमध्ये कोंडलं, पायलटनेही केलं एमर्जन्सी लँडिग
या बालिकेच्या कपाळावर दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपोआप कुंकवाचे मळवट येत आहे, अशी अफवा पसरली आहे. त्याचबरोबर या लहानग्या मुलीच्या घरात देवीच्या दगडी मूर्तीदेखील निघाल्याची अफवा परिसरात वेगाने पसरली आहे. या अंधश्रद्धेमुळे दर मंगळवारी आणि शुक्रवारी या गावाच्या परिसरातील आणि दूरवरच्या लोकांनी या चिमुकलीला भेटण्यासाठी प्रचंड गर्दी करायला सुरुवात केली आहे
इतकंच नाही तर इथे येणाऱ्या अनेक महिलांच्या अंगात देखील यायला लागलं आहे. हा प्रकार नेमका कशामुळे होतोय हे स्पष्ट नाही, परंतु देवी अवतरल्याच्या अफवेमुळे मात्र इथे पुजा करण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी होत असल्याचं चित्र आहे. देवी अवतरल्याच्या अफवेमुळे कापडशिंगी तांडा गावात मंगळवारी आणि शुक्रवारी जत्रेसारखी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं.
ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर; आताची परिस्थिती दाखवणारे भयंकर Video
या मुलीच्या चेहऱ्यावर लाल चट्टे आले आहेत. हा कुंकवाचा मळवट असून तिच्या रूपाने देवी अवतरली असल्याची अफवा परिसरात पसरली आहे. हजारोच्या संख्येनं लोक याठिकाणी गर्दी करत आहेत. मात्र, हे लाल चट्टे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आले असल्याचं अंनिसने म्हटलं आहे. मुलीची आरोग्य तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news