Home /News /maharashtra /

12वीच्या परीक्षेहून परतताना काळाचा घाला, दुचाकीच्या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर दोन जखमी

12वीच्या परीक्षेहून परतताना काळाचा घाला, दुचाकीच्या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर दोन जखमी

12वीच्या परीक्षेहून परतताना काळाचा घाला, अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दोन विद्यार्थी जखमी

12वीच्या परीक्षेहून परतताना काळाचा घाला, अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दोन विद्यार्थी जखमी

HSC student died in accident while returning from Exam: बारावीच्या परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्याच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

जळगाव, 6 एप्रिल : बारावीची परीक्षेचा (HSC exam) पेपर देऊन घरी परतत असताना जळगाव-औरंगाबाद महामार्गावर अपघात (Accident on Jalgaon - Aurangabad Highway) झाला आहे. वाकोद जवळ सिंहगड हॉटेल जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेट रोडच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात गाडी चालवत असलेला व्यंकटेश उर्फ विक्की सुधाकर सपकाळे (24 वर्षे) याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या गाडीवर मागे बसलेले दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (HSC student died in accident while returning from examination in Jalgaon) जळगाव येथून सिल्लोड तालुक्यातील गोसेगाव येथे बारावीचा पेपर देण्यासाठी जळगावातील शिवाजीनगर येथील तिघे विद्यार्थी गेले होते. व्यंकटेश सुधाकर सपकाळे, करण भगत आणि धिरज सिरसाठ हे पेपर देऊन तिघे जण बुलेट गाडीने जळगावकडे परत येत होते. मात्र, वाटेत त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाकोद नजिक सिंहगड हॉटेल जवळ आली असता अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर दुचाकी चालक विक्की उर्फ़ व्यंकटेश सुधाकर सपकाळे याच्या डोक्याला गंभीर मार लागला. या अपघातात व्यंकटेशचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेले करण आणि धिरज यांच्या हाता-पायाला दुखापत झाली. वाचा : सुसाट कार वळणावर झाली आऊटऑफ कंट्रोल, 4 पलट्या मारूनच थांबली, LIVE VIDEO हा अपघात नेमका कशाचा झाला हे मात्र कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पहुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मयताच्या नातेवाईकांना झालेल्या घटनेची माहिती दिली. तर इतर दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मृतक व्यंकटेशचा मृतदेह पहुर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला असून तेथे सकाळी शवविच्चदन केले जाणार आहे. जळगाव-औरंगाबाद महामार्गावर सध्या  अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये अपघात होऊन अनेकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना धडक देत 100 फूट फरफटत नेलं बीड येथे भीषण कार अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर रात्री घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बीडच्या घाटनादूर येथे घडली. माहितीनुसार, सोमवारी रात्री जवळपास दहा वाजेच्या सुमारास अंबेजोगाईच्या दिशेने एक कार वेगात आली. याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्टॉलवर उभ्या चार जणांना या कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा मृत्यू रुग्णालयात झाला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Jalgaon, Maharashtra News

पुढील बातम्या