मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तुमच्या गावातील निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या सरपंच आणि सदस्यांची प्रॉपर्टी किती आहे तुम्हा माहित आहे का?

मुख्य म्हणजे तुम्हाला तुमच्या सरपंच आणि सदस्यांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आणि येत्या  १८ डिसेंबर ला ७७५१ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे, यावेळी सरपंच जनतेतून निवडला जाणार आहे त्यामुळे सर्वच पक्षाची ताकद पणाला लागली आहे आणि मुख्य म्हणजे तुम्हाला तुमच्या सरपंच आणि सदस्यांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

सरपंच आणि सदस्य पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची पार्श्वभूमी , शिक्षण , उत्पन्न तसेच त्यांच्या मालमत्तेची माहिती आणि त्यांच्याविरुद्ध कोर्टात असलेले खटले ई गोष्टी माहिती असणे हा गावकऱ्यांना हक्क आहे.

या वरील गोष्टींची माहिती घेण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी करणे गरजेचे आहे.

१) सर्वप्रथम तुम्हाला https://panchayatelection.maharashtra.gov.in/ या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.

२) निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र म्हणजेच Affidavit by the final contesting candidates या क्लिक करावं लागेल

३) त्यानंतर तुम्हाला लोकल बॉडी (Local body ) या पर्यायावर क्लिक करून ग्रामपंचायत हा पर्याय निवडायचा आहे नंतर तुमचं गाव ज्या विभागात येत तो विभाग निवडायचा आहे. उदा. तुमचं गाव लातूर जिल्ह्यात येत असेल तर तुम्हाला औरंगाबाद विभाग निवडावा लागेल.

४) तिथून पुढे तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचा तालुका आणि शेवटी तुमचं गाव निवडावं लागेल. त्यांनतर Election Programe Name मध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील पहिल्या पर्याय निवडून तुम्ही सदस्यांची माहिती घेऊ शकता तर दुसरा पर्याय निवडून सरपंचाची माहिती घेऊ शकता.

५) शेवटी तुम्ही सर्च केलं तुम्हाला निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या सदस्य आणि सरपंच यांचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करून पाहू शकता.

First published:

Tags: Election