अन् राज्य मंत्र्यांनी उदयनराजे भोसले यांना केला मुजरा, या गाण्यासह VIDEO तुफान व्हायरल

अन् राज्य मंत्र्यांनी उदयनराजे भोसले यांना केला मुजरा, या गाण्यासह VIDEO तुफान व्हायरल

आज अनेक व्हाट्सअप्प ग्रुपवर हा फॉरवर्ड होताना दिसत आहे. या पाठीमागे बॅकग्राऊंड म्युझिक लावून तो व्हायरल करण्यात येत आहे.

  • Share this:

किरण मोहित, प्रतिनिधी

सातारा, 03 जुलै : राज्यमंत्री शंभूराजे देसाई हे उदयनराजे भोसले यांना लवून मुजरा करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आज अनेक व्हाट्सअप्प ग्रुपवर हा फॉरवर्ड होताना दिसत आहे. या पाठीमागे बॅकग्राऊंड म्युझिक लावून तो व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे मंत्री असोत किंवा अजून कोणी आमच्या राजांसमोर ते झुकतात असं यातून उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांना दाखावायचं असल्याच्या चर्चा सुरू आहे.

खरंतर, सध्या उदयनराजे भोसले यांच्याकडे कोणतंही पद नाही. पण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज हेच त्यांच्यासाठी मोठं पद आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचा चाहता वर्ग आहे. त्यामुळे शंभूराजे देसाई यांनीही त्यांना त्यांच्या गादीला तो मान दिला असेल.

मात्र, ज्या संविधानानुसार आज आपला देश चालतो त्या संविधानाने पद दिलेल्या व्यक्तीनं असं करणं कितपत योग्य आहे हाही महत्वाचा प्रश्न आहे. सध्या तरी या व्हायरल व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची (Covid-19 Patient) संख्या वाढत आहे. कोरोनामुळे सगळीकडेच परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. अशा परिस्थितीत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayan Raje Bhosale ) शांतच होते.

ते अनेक दिवसांपासून उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातल्या (Satara District) घडामोडींपासून चार हात लांब आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तशी दबक्या आवाजात चर्चाही सुरू होती. मात्र मागील दोन चार दिवसांपासून ते सक्रिय झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. उदयनराजे आता मैदानात उतरले असून आज त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणाही साधला.

गुरुवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपलं मत मांडले. लॉकडाउन उठविण्यासंदर्भात राज्यातील तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी बैठक घेऊन काय उपाययोजना करायच्या हे ठरवायला हवे. लोकांमध्ये सध्य असंतोष असून तो फार काळ राहणे चांगला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: July 3, 2020, 11:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading