मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमळनेरमध्ये हावडा एक्सप्रेस ट्रेनला अवजड ट्रकची जोरदार धडक; अनेक प्रवासी जखमी

अमळनेरमध्ये हावडा एक्सप्रेस ट्रेनला अवजड ट्रकची जोरदार धडक; अनेक प्रवासी जखमी

अमळनेरजवळ हावडा एक्सप्रेस ट्रेनला (Howrah express train accident) एका अवजड ट्रकने जोरदार टक्कर (Truck hit howrah express train) मारली आहे. या अपघातात अनेक प्रवाशांना दुखापत झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहाणी झाली नाही.

अमळनेर, 09 एप्रिल: महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर याठिकाणी हावडा एक्सप्रेस ट्रेनला (Howrah express train accident) एका अवजड ट्रकने जोरदार टक्कर (Truck hit howrah express train) मारली आहे. हा अपघात अमळनेर आणि धरणगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान भोणे गावाजवळ घडला आहे. या अपघातात रेल्वेतील काही प्रवांशांना दुखापत (Several passengers get injured) झाली आहे. असं असलं तरी मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातानंतर काही काळ रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. पण क्रेनच्या मदतीनं ट्रकला हटवल्यानंतर हावडा एक्सप्रेस जळगावकडे रवाना झाली. पश्चिम रेल्वे विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या अमळनेर ते धरणगाव रेल्वे स्थानकांदरम्यान मागील काही दिवसांपासून काम सुरू आहे. आज सकाळी भोणे गावाजवळील रेल्वे रुळ परिसरात काम सुरू होतं. यावेळी अमळनेरकडून येणाऱ्या हावडा एक्सप्रेसला रुळाच्या कामाची सामग्री घेऊन आलेल्या ट्रकने जोरदार टक्कर मारली आहे. यानंतर अपघाताच्या आवाजाने रुळावर काम करणाऱ्या कामगारांसोबतच आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांची मदत केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण रेल्वेतील अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघातानंतर काही काळ रेल्वेमार्गावर अपघातग्रस्त ट्रक तसाच पडून होता. त्यामुळे रेल्वेसेवेर याचा परिणाम होऊन काही गाड्यांना विलंब झाला. या अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताचं काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आणि क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त ट्रक रेल्वे मार्गातून बाजूला काढला. हे ही वाचा- पुण्यात भरधाव डंपरने बाईकस्वाराला चिरडलं, भीषण अपघाताचा थरारक VIDEO त्यानंतर काही काळ रेल्वे वाहतूकीचा खोळंबा झाल्यानंतर, अपघातग्रस्त हावडा एक्सप्रेस जळगावकडे रवाना झाली. या अपघाताचा परिणाम इतर रेल्वे गाड्यांवर झाला. परिणामी संबंधित रेल्वेला गंतव्यस्थानी जाण्यास विलंब झाला.
First published:

Tags: Jalgaon, Railway accident

पुढील बातम्या