मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, चार ते पाच तास वाहनं एकाच ठिकाणी अडकून पडले

VIDEO : मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, चार ते पाच तास वाहनं एकाच ठिकाणी अडकून पडले

भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे माणकोली ते खारेगाव या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय.

भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे माणकोली ते खारेगाव या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय.

भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे माणकोली ते खारेगाव या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

ठाणे, 24 सप्टेंबर : मुंबई आणि ठाण्यात वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. विशेषत: मुंबई-नाशिक महामार्गावर असणारी वाहतूक कोंडीची समस्या ही जणूकाही पाचवीलाच पुजली आहे. या मार्गावर फक्त दिवसाच नाही तर रात्रीदेखील प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला समोरं जावं लागत आहे. या वाहतूक कोंडीला बरेच काही कारणं आहेत. पण त्या सर्व कारणांमध्ये रस्त्यावरील खड्डे हे प्रमुख कारण आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विशेष म्हणजे आज तर या वाहतूक कोंडीची हद्दच झाली. कारण मुंबई-नाशिक महामार्गावर माजिवाडा ते माणकोली दरम्यान तब्बल चार ते पाच तास गाड्या अडकून राहिल्या. त्यामुळे वाहनचालकांपासून प्रवाशी प्रचंड वैतागले. या वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रशासन, सरकार काही उपाययोजन करतील की नाही? असा प्रश्न या निमित्ताने उभा केला जातोय.

भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे माणकोली ते खारेगाव या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे आज शनिवार म्हणजेच विकेंडचा पहिला दिवस आहे. त्यामुळे अनेक नागरिक दोन दिवसांची सुट्टी सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर फिरायला जातात. पण या नागरिकांना चार-चार तास ट्राफिकमध्ये अडकून पडावं लागल्यामुळे त्यांचा प्रचंड हिरमोड झाल्याचं चित्र आहे.

(गाडीतून खाली उतरले अन्..; चहामुळे वाचला संपूर्ण कुटुंबाचा जीव, नाशिकमधील थरारक घटना)

ठाण्यातील माजीवाडा ते भिवंडीतील माणकोलीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी आहे. गेल्या चार ते पाच तासांपासून या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे माणकोलीच्या पुढे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्यासमोर नेहमी वाहतूक कोंडी निर्माण होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलं आहे. पण परिस्थिती जैसे थे आहे. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका देखील अडकलेल्या आहेत. केंद्रीय मंत्री राहत असलेल्या परिसरात अशी परिस्थिती असल्याने अनेकांकडून टीका देखील केली जात आहे. या वाहतूक कोंडीच्या समस्येपासून नागरिकांची कधी मुक्तता होईल? असा प्रश्न नागरिकांना पडतोय.

First published: