Home /News /maharashtra /

राज्यात ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार, हवामान विभागानं दिला Red Alert

राज्यात ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार, हवामान विभागानं दिला Red Alert

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून Red Alert दिला आहे.

    मुंबई, 12 जुलै : राज्यात गेले काही दिवस दडी मारून बसलेला मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या (Coastal) भागात पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली आहे. किनारपट्टीच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत असून मंगळवारी चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rains) इशारा देण्यात आला आहे. रायगड, (Raigad) रत्नागिरी, (Ratnagiri) कोल्हापूर (Kolhapur) आणि सातारा (Satara) या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून रेड अलर्ट (Red Alert) दिला आहे. राज्यातील पावसाचा अंदाज चार जिल्ह्यांतील डोंगराळ परिसरात अतिमुसळधार पाऊस शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुणे, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. तर नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे वाचा - पावसाळी अधिवेशनात भाजप आणणार लोकसंख्या नियंत्रण विधेयक, ‘या’ 3 तरतुदींकडे लक्ष मान्सून परतल्यानंतर पेरण्यांना वेग मान्सून देशात आणि महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर काही दिवस जोरदार बरसला आणि गायब झाला. मान्सून गायब होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने अगोदरच दिला होता. शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, अशा इशाराही हवामान तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार पाऊस खऱोखरच गायब झाला आणि पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा परतला आहे. ज्यांनी पेरण्या केल्या नाहीत, त्यांच्या शेतात आता पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे. जर अगोदरच पेरण्या केलेले शेतकरी पिकं वाळून जाण्याच्या शक्यतेमुळे चिंताग्रस्त होते. मात्र आता मान्सून परतत असल्यामुळे त्यांनादेखील दिलासा मिळाला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Rains, Weather forcast

    पुढील बातम्या