मुंबई, 24 जून : राज्यात पुढील दोन दिवस म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार (Friday and Saturday) कोकणात (Kokan) मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy rains predicted) हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, (Central Maharashtra) कोकण, (Kokan) गोवा, (Goa) मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भ (Vidarbha) या सर्व भागात पावसाच्या सरी कोसळणार असून काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
कोकणात 25 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, तर इतर भागात सामान्य पाऊस राहिल, असं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज नसून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, तर काही भागात तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात मात्र काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वास्तविक, पुढील पूर्ण आठवड्यासाठी हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी तो काही तुरळक ठिकाणी पडेल, असं सांगण्यात आलं आहे. बहुतांश महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची तर काही भागात उघडीप मिळण्याचीदेखील शक्यता आहे.
वेगवेगळ्या अंदाजांमुळे शेतकरी संभ्रमात
हवामान खात्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर बुधवारी हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी पुढील आठवड्यात पाऊस दडी मारणार असून उकाडा वाढेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला होता. त्यानंतर आता गुरुवारी हवामान खात्याने काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पेरण्या करायच्या की नाही, याबाबत शेतकऱ्यांमधील संभ्रम वाढत असल्याचे चित्र आहे.
परिस्थितीनुसार बदलतो अंदाज
हवामानाचा अंदाज हा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार लावण्यात येत असतो. परिस्थिती बदलली की नव्या परिस्थितीनुसार अंदाज वर्तवण्यात येत असतात. त्यामुळे हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार नियोजन करणेच योग्य ठरेल, असं हवामान तज्ज्ञ सांगतात. हवेची दिशा, ढगांचा प्रवास, आर्द्रता आणि वातावरणातील दाब या सतत बदलत राहणाऱ्या गोष्टी असल्यामुळे त्यानुसार अंदाज बदलत राहतो.
हे वाचा - pune ambil odha : आंबिल ओढ्याच्या स्थानिकांना कोर्टाचा दिलासा, तोडकामाला स्थगिती
ऋतुचक्राचा विचार
गेल्या काही वर्षांपासून ऋतुचक्र हे काहीसे पुढे गेल्याचं दिसून येत आहे. जूनमध्ये सुरु होणारा पावसाळा वास्तविक जुलैमध्ये सुरु होत असल्याचं दिसून आलं आहे. अनेकदा जूनमध्ये येणारा पाऊस सुरुवातीच्या शिडकाव्यानंतर दडी मारतो आणि थेट जुलैमध्ये परततो, असा अनुभव गेल्या काही दिवसांत आला आहे. अनेकदा नवरात्रीपर्यंत आणि कधी कधी तर दिवाळीतही पाऊस पडत असल्याचा अनुभव गेल्या काही वर्षात आल्यामुळे पिकांचं नियोजन करणं हे मोठं आव्हान सध्या शेतकऱ्यांसमोर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.