Rain Live Updates : राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 1-2 दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी तर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान खात्याने आजही असाच पाऊस राहील, असा इशारा दिला आहे. 20 जुलैला ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट म्हणजेच अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाच्या या इशाऱ्यामुळे आज मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच स्थानिक प्रशासनाने तिथल्या परिस्थितीनुसार शाळांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू
तर 21 जण जखमी
या गावातील लोकसंख्या 228 आहे
48 कुटुंबांची ही वाडी होती
57 लोकांना आतापर्यंत बाहेर काढलं आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत
महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती
कोल्हापुरात मुसळधार पाऊस
पंचगंगा नदीच्या पात्रात गेल्या 24 तासात 10 फुटांनी वाढ झाली
इशारा पातळीकडे नदीने वाटचाल सुरू केली आहे
हवामान विभागाकडून आजही मुसळधार पावसाचा इशारा
ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबईसाठी यलो अलर्ट
पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला