मुंबई, 2 सप्टेंबर : राज्यात गणेशोत्स्वाची धूम आहे. कोरोनामुळे मागील 2 वर्ष गणेशोत्सव नागरिकांना आपल्या मनाप्रमाणे उत्साहात साजरा करता आला नाहीत. मात्र, यावर्षी संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. त्यात आता गणेशोत्सवातही पुन्हा वरुण राजा बरसणार आहे. हवामान खात्याने याबाबतची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने काय म्हटले - रायगड, ठाणे, अहमदनगर भागात, तसेच पुणे, नाशिक जवळील मध्यम ते तीव्र मेघगर्जनेचे ढग दिसले. त्यामुळे पुढील 2 ते 3 तासांत या भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच मुंबईसह कोकणातही ढगांचा गडगडाट आहे. त्यामुळे याठिकाणीही पुढील 3-4 तासांत तुफान पावसासह मेघगर्जनेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
16.15 hrs 2 Sept, Thunder clouds over Konkan region including Mumbai too. Also in Ghat areas & N madha mah, adj areas ..
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 2, 2022
Possible thunder with rains, next 3,4hrs pic.twitter.com/1Y285ZaTsM
महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. पावसाने आराम घेतल्याने राज्यातील पावसाळा लवकर संपणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण राज्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. विशेष म्हणजे राज्यभरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. या उत्साहात पावसाच्या रिमझिम सरींनी बरसत गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. हेही वाचा - Shocking! गर्दी दिसताच वाढवला स्पीड, सर्वांना उडवत-चिरडत गेली कार; त्याच गाडीतून शूट केला VIDEO विशेष म्हणजे सुरुवातीला रिमझिम वाटणारा याच पावसाने आता आक्रमक रुप घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबतचा इशारा दिला आहे. विशेषत: मुंबईसाठी हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.