मुंबई, 3 ऑगस्ट : राज्यात यंदा जुलै महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भात पावसाने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. त्यात गेल्या काही दिवसात पावसाने उघडीप घेतली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे.
हवामान खात्याने काय म्हटले -
गेल्या काही दिवसात पावसाने उघडीप घेतली, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. पुढचे 5 दिवस हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत काही दिवसांपासून अतिशय उष्ण, दमट हवामान आहे. पाऊस नसल्याने व आर्द्रतेची उच्च पातळी असल्याने अस्वस्थता निर्देशांक (DI) खूप जास्त आहे आणि तो असह्य पण होत आहे, अशी परिस्थिती आहे. मुंबईकर पावसाची वाट पाहत आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे.
Gradual increase in the rainfall activity expected over the region . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/exV7WcKDmo
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 3, 2022
पुढचे 5 दिवस हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तोवर आरोग्याची काळजी घ्या व स्वतःला हायड्रेट ठेवा, असे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.
हेही वाचा - Osmanabad : 6 व्या शतकातील धाराशीव लेणीचे सौंदर्य खुलले, ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी
कोल्हापुरात यलो अलर्ट
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात पाऊस पडण्यासाठी कोणतीही पूरक स्थिती नाही. त्यामुळे राज्यात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणासाह कोल्हापूरला (३, ४ ऑगस्ट) यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Rain fall, Rain updates